#MokaleVha मी मोठा, की तू...?

रेश्मा दास, मानसोपचारतज्ज्ञ
Sunday, 1 November 2020

जॉगिंग ट्रॅकवरून चालताना पाटील काकांना जान्हवी बाकावर बसलेली दिसली.
‘काय निंबाळकर मॅडम! मावळतीच्या रम्य वातावरणात अशा कोमेजलेल्या फुलासारख्या का बसलात? निखीलशी भांडण झाले की काय?’ आपल्याच विचारांत रमलेल्या जान्हवीने काकांच्या बोलण्याने भानावर येत, ‘काही नाही हो, असेच...!’ म्हणत उगीचच हसू गालावर आणले. काकांच्या लक्षात आले, काहीतरी बिनसले आहे. निखिलला लहानपणापासून ओळखणारे शेजारचे पाटील काका एकाच ओपीडीमध्ये डॉक्टरीपेशात काम करणाऱ्या जोडप्याला-जान्हवी व निखिलला चांगले जाणून होते.

जॉगिंग ट्रॅकवरून चालताना पाटील काकांना जान्हवी बाकावर बसलेली दिसली.
‘काय निंबाळकर मॅडम! मावळतीच्या रम्य वातावरणात अशा कोमेजलेल्या फुलासारख्या का बसलात? निखीलशी भांडण झाले की काय?’ आपल्याच विचारांत रमलेल्या जान्हवीने काकांच्या बोलण्याने भानावर येत, ‘काही नाही हो, असेच...!’ म्हणत उगीचच हसू गालावर आणले. काकांच्या लक्षात आले, काहीतरी बिनसले आहे. निखिलला लहानपणापासून ओळखणारे शेजारचे पाटील काका एकाच ओपीडीमध्ये डॉक्टरीपेशात काम करणाऱ्या जोडप्याला-जान्हवी व निखिलला चांगले जाणून होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘काका, निखीलचे वागणे ...’, जान्हवी रडू लागली.
काकांनी धीर देऊ लागले. जरा शांत झाल्यानंतर जान्हवी बोलू लागली, ‘काका त्याने आज पुन्हा प्रीस्क्रिप्शन फाडले. केबिनमध्ये बसलेल्या पेशन्ट्ससमोर! काका माझ्या आई-बाबांनीही कष्ट करूनच मला डॉक्टर केले. स्वतः मेहनत करून डिस्टिंगशन मिळवले, येणारे पेशन्ट्स मॅडमकडून ट्रिटमेंट घ्यायची म्हणतात तर याचा निखिलला का त्रास होतो, सर्वकाही दोघांचेच आहे ना?
तुला काय कळते, म्हणून सतत चिडत असतो. पेशन्ट्सची गर्दी माझ्याकडे जास्त असते त्यामध्ये माझा काय दोष?’

सर्वप्रकार काकांच्या लक्षात आला, ‘बेटा, याला सुपॅरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. आपणच श्रेष्ठ असावे, आपल्यापुढे कोणीही जाता काम नये, गेलाच तर त्याविषयी तिरस्कार किंवा असूया बाळगणे. हा प्रकार सर्व क्षेत्रातील एकत्र काम करणाऱ्या कोणत्याही नात्यांमध्ये असतो.’
समोरून पूजा आलेली दिसली तिला पाहून काका म्हणाले, ‘ही बघ पूजा, आयटी कंपनीत उच्चपदावर काम करते, पण काही दिवसांपूर्वी तीही अशीच मित्रमैत्रीण दुरावल्याचे सांगत होती. तिला प्रमोशनसोबत अमेरिकेतील नामांकित कंपनीचे प्रोजेक्ट मिळाले. ती पुढच्या महिन्यात अमेरिकेत जातेय. पण तिच्या प्रगतीने काही सहकारी दुरावले.’

डोळे पुसणाऱ्या जान्हवीकडे पाहत काका बोलले, ‘असलेले जपावे आणि नसलेले अंथरूण पाहून कमवावे. जो-तो, ज्याच्या-त्याच्या कलागुणांनी, कष्टाने, कधी मन मारून तर कधी अथक प्रयत्न करून प्रगती करत असतो. प्रावीण्य मिळवत असतो. एक कौतुकाची फुंकर किंवा शाबासकी, प्रोत्साहन देणारी आश्वासक थाप पाठीवर मिळाली, की करणाऱ्याचे बळ वाढते. तो जोमाने कामाला लागतो. आजकाल लहान मुलांमध्येही या गोष्टींचा फोबिया झाला आहे. म्हणून घरी हट्टीपणा करतात, नाहीतर बाहेर मुलांमध्ये विध्वंसक बनतात.’

काका म्हणाले, ‘वडीलधाऱ्यांची जवळच्या मित्रांचे समूह किंवा प्रसंगी समुपदेशकाचीही भूमिका इथे चिघळण्याआधी गोष्टी सुधारायला मदत होते. परिस्थितीची, तुझा उद्देश व मनातील विचारांची स्पष्टपणे जाणीव करून दे निखिलला. होईल सर्व ठीक.’

‘हो काका, आज खूप मोठे ओझे कमी केलेत माझ्या मनावरचे. सगळे स्पष्ट आणि लख्ख दिसत आहे. बोलते मी निखीलशी!’, जान्हवी उठत आत्मविश्वासाने म्हणाली. काका बाकड्यावर सांजवेळी मावळतीला कललेल्या केशर-सोनेरी किरणांची तेजोमय किरणे पसरवणाऱ्या आणि उद्या पुन्हा गुलाब-केशरी रंगातून तेज घेऊन येणाऱ्या सूर्याकडे पाहत बसले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha article reshma das