esakal | #MokaleVha समस्यांवर बोलू काही
sakal

बोलून बातमी शोधा

Dr-Sucheta-Kadam

एखाद्या माणसाने आपण विवाहित आहोत, हे लपवून ठेवून दुसऱ्या अविवाहित स्त्रीशी लग्न केले, तर कायद्याने असे दुसरे लग्न संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच स्त्रीला आपले लग्न रद्द समजून दुसऱ्या व्यक्तीशी कायदेशीर विवाह करणे शक्य आहे. बेकायदेशीर लग्न रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्याची गरज नसते.

#MokaleVha समस्यांवर बोलू काही

sakal_logo
By
डॉ. सुचेता कदम

माझे वय २५ असून, वडील नाहीत. सहा महिन्यांपूर्वी मी एका व्यक्तीशी पळून जाऊन लग्न केले. परंतु, नंतर कळले की त्याचे आधी एक लग्न झाले असून, त्यास १० वर्षांचा मुलगादेखील आहे. मी काय करू?
- एखाद्या माणसाने आपण विवाहित आहोत, हे लपवून ठेवून दुसऱ्या अविवाहित स्त्रीशी लग्न केले, तर कायद्याने असे दुसरे लग्न संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच स्त्रीला आपले लग्न रद्द समजून दुसऱ्या व्यक्तीशी कायदेशीर विवाह करणे शक्य आहे. बेकायदेशीर लग्न रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्याची गरज नसते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्हाला ६ वर्षांचा मुलगा असून, आम्ही दोघे नवरा-बायको कमवतो. परंतु, नवरा मुलाचा, माझा व घरातला कोणताही खर्च उचलत नाही. त्यामुळे माझी आर्थिक ओढाताण होते. घटस्फोट घेऊन नवऱ्याकडून पोटगी मिळविता येईल का?
- नवरा बेजबाबदारपणे वागून बायको व अल्पवयीन मुलाची कोणतीही आर्थिक जबाबदारी घेत नसल्यास फौजदारी कोर्टात अर्ज करून पोटगी मागता येऊ शकते. अल्पवयीन मुलांना वडिलांकडून परिस्थितीनुरूप पोटगी मागण्याचा हक्क आहे. ही पोटगी मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत पालनपोषणासोबत वैद्यकीय व शैक्षणिक खर्चांसाठी मिळू शकते.

Edited By - Prashant Patil

loading image