#MokaleVha : 'समाधानाचे क्रेडीट्स'

Satisfaction Credits
Satisfaction Credits

आपण आपल्या आजी-आजोबांकडून नेहमी ऐकत आलो आहोत, की चांगल्या कामाचे फळ नेहमी चांगलेच मिळते. आपल्या हातून कुठलेही पाप घडू देऊ नका, ही नैतिक मूल्ये माणसांचे आयुष्य घडवितात, हे लक्षात असले पाहिजे. माझा भाऊ सिद्धार्थ आणि त्याची बायको साक्षी हे त्यांच्या मुलाला नेहमी सांगतात की, त्यांनी सर्व मित्रांना मदत करावी. उलट उत्तर न देता मोठ्यांचे ऐकावे. ‘क्रेडिट्स’ हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका करीत असतात. ‘क्रेडिट्स’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधील पुण्य किंवा त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी; हे चांगले कार्य आयुष्याच्या पासबुकमध्ये जमा होते आणि नक्कीच त्याची त्याला चांगली भेट/परतफेड मिळते.

आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की, देव झोपलेला नाही, तर ‘क्रेडिट्स’ हे तोच ठरवीत असतो. पैसे कमविणे आवश्यक असले, तरी ते सर्वस्व म्हणून बघितले जाता कामा नये. त्याच्याव्यतिरिक्त तुम्ही काय चांगले काम केले आहे, त्याला ‘क्रेडिट्स’ म्हणू शकतो. बँकिंगच्या भाषेत, पासबुकमध्ये जमा झालेले पैसे याला ‘क्रेडिट्स’ म्हणतो. तसेच, माणसाने आयुष्यामध्ये केलेल्या चांगल्या कामची जमापावती म्हणजे ‘क्रेडिट्स’ची पावती. 

आपण बऱ्याचदा ऐकतो की, आम्ही पैसे कमवू शकलो नाही, तरी माणसे कमवली. पूर्वीच्या लोकांनी माणसे जोडली, हेच आता नवीन येणाऱ्या पिढीने केले पाहिजे. मीडिया, सोशल मीडियाचा उपयोग नवीन पिढीने माणसे जोडण्यासाठी केला पाहिजे. भारत हा लोकांना परंपरा, संस्कृती, सामाजिक नीतिमूल्यातून जोडणारा देश आहे. एकमेकांना मदत करणे, वेळेला धावून जाणे, हे सर्व गोष्टींना आपण त्या त्या व्यक्तीचे ‘क्रेडिट्स’ म्हणू. ‘क्रेडिट्स’ कमवायचे असल्यास त्याला नक्कीच काही मापदंड आहेत, त्यामध्ये क्रेडिट गुण आहेत.

हे गुण उदाहरण म्हणून दिलेले असले, तरीदेखील याचे प्रत्येक्षात खूप महत्त्व नक्कीच आहे. आजकाल खरे मदतीला येणारे लोक कमी झाल्यासारखे वाटतात. लोकांनी सामाजिक धारणादेखील आत्मसात केली पाहिजे. सामाजिक नीतिमूल्ये, संस्कृती, माणुसकीची जाणीव तळागाळापर्यंत पोचली पाहिजे. यामुळे एक चांगला माणूस म्हणून आपण आयुष्याचे ‘क्रेडिट्स’ कमावू शकू. माणुसकीला जपू. माणसे जोडण्याचे काम खूप मोठे आहे.

पैशासाठी माणुसकी सोडू नये ही, आपल्या देशाची परंपरा समजायला हरकत नाही. जसा माणूस यशस्वी होतो, तसाच तो एका क्षणात अयशस्वीदेखील होऊ शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे आणि ‘क्रेडिट्स’ कमवायच्या मागे लागले पाहिजे. म्हणजेच, आयुष्यामध्ये समाधान मिळेल व मदत केलेल्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याने आयुष्य सुखकर, सुलभ होईल.
‘माणुसकी हाच आपला धर्म आहे
‘क्रेडिट्स’ हीच आयुष्याची जीवनपुंजी आहे’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com