
आपण नेमके कोण आहोत, आपले अस्तित्व काय, हे प्रश्न माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. या प्रश्नाच्या कुतूहलातून डार्विनने अभ्यासाला सुरुवात केली. आपल्या या प्रवासात त्याला जे जाणवले ते त्याने नेटाने सर्वांसमोर मांडले. अभ्यासातून त्याला जी उत्तरे मिळाली ती त्याने व्यक्त केली; पण तसे असले तरी हे अंतिम सत्य नाही हे तो मान्य करत होता. त्याने तथ्य पडताळणीचे आपले काम थांबवले नाही. कारण त्याचे कुतूहल जागृत होते. आपला प्रवास मात्र आता उलट्या दिशेने जातोय.