
मयूर भावे - mayur.bhave@esakal.com
व्यवहाराचे आडाखे, नफा-तोट्याची गणिते आणि मागणी-पुरवठ्याच्या चौकटबंद ठोकताळ्यांच्या पलीकडे ज्या वेळी एखादा उद्योजक जातो, तेव्हा तो केवळ त्या उद्योग समूहाचं प्रतिनिधित्व न करता विविध कारणांमुळे त्या समूहाशी जोडल्या गेलेल्या माणसांचं, साधनांचं प्रतिनिधित्व करू लागतो. त्याची दृष्टी काळाच्या पलीकडच्या भविष्याचा वेध घेऊ लागते आणि त्याचा वर्तमान विचारशील कृतीचा पायंडा पाडत जातो. उद्योजक काकासाहेब चितळेंचं कृतार्थ जीवन याहून वेगळं नाही!