- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
क्रांतीची ऊर्मी घेऊन उद्याच्या दिशा धांडोळणाऱ्या तरुणाईवर त्यावेळेस मृणालताईंचा प्रभाव होता. तेव्हाच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाऱ्या कुणाला द्यायच्या यावर खासदारांचा विशेष प्रभाव होता. तेव्हा कमलाकर ठाणेकर राष्ट्र सेवादलाच्या मुशीतून आलेले समर्पित कार्यकर्ते होते. त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न केले. तेव्हा आमच्या समर्पित नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला. त्याचा निषेध म्हणून जन्माला आली आमची ‘रोड पार्टी’; पण आम्ही विचार करीत होतो त्याच्या विपरीत चित्र दिसायला लागलं.