
दिवाकर चौकेकर - choukekar.divakar@gmail.com
गझलसंग्रहाच्या नावापासूनच हा संग्रह आगळावेगळा व बहुरंगी आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. विविध वैशिष्ट्ये घेऊन आलेला हा नवा गझलसंग्रह वाचकांच्या हाती सुपूर्द करणारा गझलकार हा एक तरुण, नम्र स्वभावाचा, उमदा कलाकार आहे. आपल्या सखीबद्दलचा विश्वास स्पष्टपणे व्यक्त करायला सुद्धा हा तरुण गझलकार कचरताना दिसत नाही. आता ज्या गझलेवरून या संग्रहाला ‘मल्टीकलर’ हे शीर्षक दिले गेले आहे ती गझल पाहूयात...!