esakal | देवतांना आवडणारी फुले, वस्त्र व नैवेद्य
sakal

बोलून बातमी शोधा

arendra dharane writes about the flowers, clothes and offerings that the deities love

देवतांना आवडणारी फुले, वस्त्र व नैवेद्य

sakal_logo
By
पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)


१ श्री गणपती : तांबडी फुले, जास्वंदी फुले, मंदार पुष्पे, दूर्वा, शमी, रक्तचंदन, तांबडी कमळे, शेंदूर, वस्त्र- तांबडे. नैवेद्य- मोदक.

२. श्री शंकर : रुई, बिल्वपत्र, शमीपत्रे, पांढरी फुले, पांढरी कुठहेरी, धोतरा, आंब्याचा मोहर. वस्त्र- पांढरे किंवा निळे, नैवेद्य- दहीभात.

३. श्री विष्णू : केवडा, मोगरा, चाफा, गुलाब, कुंद जाई, तुलसी, पांढरे किंवा तांबडे कमळ. वस्त्र- पिवळे. नैवेद्य- दूधभात.

४. श्री देवी माता- बकूळ, दोनपुष्प, वस्त्र- लाल, नैवेद्य- श्रीखंड, सांजा.

पंचोपचार पूजा :- गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य. पंचनदी : गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा.

पंचपल्लव : पिंपळ, औदुंबर, अशोक, आंबा, वड यांची पाने. पंचपुष्प : चमेली, शमी, कमळ, आंबा मोहर, कन्हेर.

पंचामृत : गायीचे दूध, साखर, तूप, मध, दही.

वरील गोष्टीनी सर्व देवतांचे पूजन केले असता सुखशांती, समृद्धी जीवनात प्राप्त होते.

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top