
लेखक : ॲड. सुशील अत्रे
भारतातील काही राजवंश असे आहेत, जे अगदी प्रदीर्घ काळ सत्तेवर होते; पण त्यांची विशेष दखल इतिहासाने घेतली नाही. कलचुरी वंश हा अशाच राजवंशांपैकी एक आहे. सुमारे १२०० वर्षे हा वंश भारतात कुठेना कुठे सत्तेत होता, पण त्यांच्या कोणत्याच राजाची कारकीर्द देदीप्यमान, असाधारण नव्हती. शिवाय कलचुरी राजे एकसलग असे कधी गादीवर आले नाहीत. त्यामुळे भारतीय राजवंशांचा विचार करताना ते नकळत कुठेतरी मागच्या रांगेत जातात. पु. लं.च्या भाषेत सांगायचं तर ते ‘नट’ नव्हे; तर ‘बोलट’ ठरतात...
कलचुरी वंश ‘महिष्मतीचे कलचुरी’, ‘त्रिपुरीचे कलचुरी’, ‘रत्नपूरचे कलचुरी’ आणि ‘कल्याण कलचुरी’ अशा चार शाखांमधे विभागला आहे. या चारही शाखांचा एकत्रित विचार केल्यास ते इ. स. ५५० ते १७४० एवढा काळ ठिकठिकाणी सत्तेत होते. ‘कलचुरी’ या नावाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तो संस्कृतोद्भव शब्द नाही, हे निश्चित! वा. वि. मिराशी या नावाचे पर्यायी शब्द कटच्चुरी, कलत्सुरी, कालच्चुरी, कलचुर्य असेही असल्याचे नमूद करतात. मुजूमदारांच्या व डॉ. भांडारकरांच्या मते कलचुरी हे मुळात परदेशी असावेत आणि ‘कलचुरी’ हा शब्दही तुर्की उद्गमाचा असावा. पण स्वत: कलचुरी राजे काही ताम्रपट व लेखांमध्ये स्वत:ला हैहय वंशाचे मानतात. (saptarang latest article on Kalachuri dynasty )