राजवंश भारती : कलिंग राजवंश- 1

Kalinga Dynasty : प्राचीन कलिंग प्रदेश म्हणजे मुख्यत्वे आजचे ओडिशा राज्य. या कलिंगाचा उत्तर भाग ‘उत्तर कलिंग’ म्हणजे ‘उत् कल’- उत्कल म्हणून ओळखला जातो.
The 'Elephant Cave' at Udayagiri.
The 'Elephant Cave' at Udayagiri.esakal
Updated on

लेखक : ॲड. सुशील अत्रे

ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसच्या नोंदींचा आधार घेऊन थोरला प्लिनी या रोमन इतिहासकाराने तत्कालीन कलिंगदेशाचे वर्णन ‘कलिंगे’ या नावाने केले आहे. प्राचीन कलिंग प्रदेश म्हणजे मुख्यत्वे आजचे ओडिशा राज्य. या कलिंगाचा उत्तर भाग ‘उत्तर कलिंग’ म्हणजे ‘उत् कल’- उत्कल म्हणून ओळखला जातो. (saptarang latest article on Kalinga Dynasty part 1)

हाथी गुंफामधील सम्राट खारवेलाचा शिलालेख.
हाथी गुंफामधील सम्राट खारवेलाचा शिलालेख. esakal

प्राचीन कलिंग प्रदेश म्हणजे मुख्यत्वे आजचे ओडिशा (आधी ‘ओरिसा’) राज्य. महाभारत काळात अंग, वंग, कलिंग, पुंड्र आणि सुह्म असे पाच प्रदेश पूर्वोत्तर भारतात होते. ही पाच मुले बलि राजाची, दीर्घतमस् ऋषींकरवी नियोगाने झालेली अपत्ये होती, अशी कथा आहे. त्यांच्यापैकी कलिंगाने स्थापन केलेला तो कलिंग प्रदेश.

या कलिंगाचा उत्तर भाग ‘उत्तर कलिंग’ म्हणजे ‘उत् कल’- उत्कल म्हणून ओळखला जातो. राष्ट्रगीतातील ‘द्राविड उत्कल वंग...’मधले उत्कल! महाभारत युद्धात कलिंग कौरवांच्या बाजूने होते. त्या वेळच्या कलिंग राजाचे नाव होते श्रुतायुध. याची कथा मनोरंजक आहे. त्याला वरुणदेवाच्या वराने एक अजिंक्य गदा मिळाली होती. पण, अट ही होती की ती नि:शस्त्र माणसावर कधीही चालविता कामा नये.

युद्धात श्रुतायुधाने ती गदा रागाच्या भरात नि:शस्त्र कृष्णाला फेकून मारली आणि अट मोडल्याने तीच गदा श्रुतायुधावर उलटून आली आणि त्या आघाताने तो मृत झाला. यानंतर अनेक राजे गादीवर आले आणि गेले. इ. स. पूर्व सुमारे नवव्या शतकात कलिंगाचा ‘अवकिन्नायो करकंडा’ या नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो २३ वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा अनुयायी होता, असा उल्लेख जैन पुराणांमध्ये येतो.

पुढे कलिंग प्रदेश मगधाच्या नंद वंशाच्या ताब्यात होता. नंतर मौर्य साम्राज्यात होता. यानंतर कलिंग इतिहासात नोंदले गेले, ते सम्राट अशोकामुळे. प्रचलित इतिहासानुसार ज्या भीषण युद्धामुळे अशोकाला उपरती झाली आणि त्याने हिंसेचा त्याग केला, ते युद्ध ‘कलिंगचे युद्ध’ म्हणून ओळखले जाते. पण, या युद्धात अशोकाविरुद्ध लढलेला कलिंग राजा अथवा सेनापती कोणता, त्याचे नाव काय, याची कुठेही नोंद नाही. हे युद्ध इ. स. पूर्व २६१ मध्ये झाले. इथपर्यंत कलिंगावर राज्य करणारा कोणताही निश्चित राजवंश आढळत नाही. राजे अनेक होऊन गेले. (latest marathi news)

The 'Elephant Cave' at Udayagiri.
अपराधी भावनांतून मुक्ती

महामेघवाहन वंश : खारवेल

कलिंग युद्धानंतर तीस-एक वर्षांत महामेघवाहन वंश सत्तेवर आला. हे राजे स्वत:ला चेदी राज्याचे वंशज म्हणवून घेत होते. शंभर अपराधांची कथा ज्याची आहे, तो शिशुपाल हाही चेदी राज्याचा राजा. वंशाचा मूळ पुरुष पुराणांनुसार ‘उपरिचर वसू’ आहे. त्याचा वंशज ‘महामेघवाहन’. त्यामुळे चेदी अथवा महामेघवाहन या नावांनी हा वंश ओळखला गेला.

या महामेघवाहन राजवटीत सगळ्यात प्रसिद्ध राजा होता ‘खारवेल’. यानेही जैन धर्म स्वीकारला होता. खारवेल राजाची आपल्याला व्यवस्थित माहिती मिळू शकते, ती ‘हाथीगुंफा’ शिलालेखावरून. ओडिशात भुवनेश्वरजवळ उदयगिरी आणि खंडगिरी टेकड्यांवर अनेक लेण्या कोरलेल्या आहेत. यापैकी उदयगिरीवरील एक लेणे ‘हाथी गुंफा’ म्हणून ओळखले जाते.

यात खारवेलाचा एक प्राकृत ब्राह्मी शिलालेख आहे. त्यात १७ ओळी आहेत. त्यांच्यावरून आपल्याला खारवेलाच्या कारकीर्दीविषयी समजते. हा एक शिलालेख खारवेलाचे जणू चरित्रच सांगतो. तो युवराज कधी झाला, राजपदावर कधी बसला, त्याच्या कारकीर्दीच्या कितव्या वर्षी कोणती मोहीम त्याने हाती घेतली, याची सगळी माहिती हाथीगुंफा शिलालेखात आहे.

खारवेलाला समकालीन असलेल्या सातकर्णी या सातवाहन राजावर, मगध राजा ‘बहसतीमित’ (बृहस्पतिमित्र?) वर, पांड्य राजावर... अशा अनेक राजांवर त्याने स्वाऱ्या केल्या. नंद राजवटीत कलिंगातून बळजबरीने मगधात नेलेल्या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती खारवेलाने मगधावर हल्ला करून परत कलिंगात आणल्या. (latest marathi news)

The 'Elephant Cave' at Udayagiri.
गरज पालकांच्या समुपदेशनाची!

एक प्रकारे मगधावर सूड उगविला. ‘खारवेलाच्या पराक्रमाने भिऊन यवन राजा/ सेनापती ‘दिमिता’ मथुरेला पळाला, असा उल्लेख शिलालेखात आहे. हा दिमिता म्हणजे ग्रीक सेनापती डिमिट्रियस-१ असावा, असा राखालदास बॅनर्जी वगैरे इतिहासकारांचा अंदाज आहे.

यात मुख्य अडचण अशी आहे, की खारवेलाचा जन्म, मृत्यू याचा निश्चित उल्लेख या शिलालेखात किंवा अन्य कुठेही नाही. त्यामुळे तो कोणाचा समकालीन होता, हे खात्रीने सांगता येणार नाही. त्याचा जन्म इ. स. पूर्व २००- १९७ च्या सुमारासचा असावा.

त्याची राजा म्हणून कारकीर्द १३ वर्षांची आहे. नंतर त्याने राजसंन्यास घेतला आणि ‘भिक्षुराजा’ हे नाव धारण केले. तसा उल्लेख शिलालेखात आहे. यशोवर्मन किंवा शशांकाप्रमाणे खारवेल हाही आपल्या संपूर्ण वंशाला पुरून उरलेला पराक्रमी आणि कर्तृत्ववान राजा होता, यात शंका नाही.

तसे पाहिले तर खारवेल, महामेघवाहन वंशातील तिसऱ्या पिढीतील राजा होता. शिलालेखांवरून या वंशातल्या जवळजवळ सात-आठ राजांची नावे सापडतात. खारवेल हा वक्रदेवाचा मुलगा असावा. ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसच्या नोंदींचा आधार घेऊन थोरला प्लिनी या रोमन इतिहासकाराने तत्कालीन कलिंगदेशाचे वर्णन ‘कलिंगे’ या नावाने केले आहे.

त्यानुसार तेव्हाच्या कलिंग राजाकडे ६० हजार सैन्य, एक हजार घोडे व ७०० हत्ती सज्ज होते. साहजिकच त्यानंतर, खारवेलाच्या उत्कर्षाच्या काळात ही ताकद कितीतरी जास्त असणार! पण, तेरा वर्षे उत्तम आणि कल्याणकारी राज्य करून, इतिहासात स्वत:चे स्थान निर्माण करून खारवेल समाधानाने निवृत्त झाला, हे अधिक महत्त्वाचे आहे. 

The 'Elephant Cave' at Udayagiri.
मोफत घरांमुळे मुंबईची कोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com