
लेखिका : तृप्ती चावरे-तिजारे
विनोद करणे, स्वतःच्या विनोदावर इतरांनी हसणे आणि इतरांच्या विनोदावर आपल्याला हसू येणे या तीनही क्रिया माणसाला सुखावतात. आपण केलेल्या भाषिक अर्थाच्या कल्पनेला हलकासा धक्का लागून निघणारा मजेशीर अर्थ म्हणजे विनोद. विनोदनिर्मिती ही एक महत्त्वाची भाषिक क्रिया आहे. काही विनोदांना भाषिक आणि साहित्यिक दर्जाच नसतो, त्यावर काय बोलायचे ? त्यावर फक्त फिदीफिदी हसताच येऊ शकते.
पण काही विनोदांना वेगळ्या उंचीचा अभिजात दर्जा असू शकतो. तो अभ्यासण्यासाठी, साहित्य गुणांवर आधारित भाषेच्या काही गमतीजमती आणि त्यातून गवसणारी, भाषिक, प्रासंगिक, मार्मिक आणि दर्जेदार अभिजात विनोदनिर्मिती या लेखातून आपण बघणार आहोत. ( Quality of humor in language and humor in language)