सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य विल्हेवाट; पर्यावरणाची गरज #HealthOfJanani

शरयू काकडे
मंगळवार, 5 जून 2018

जितक्या सहज सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होतात तितक्या सहज ते नष्ट होत नाही. सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्यामुळे पर्यावरण खूप मोठी हाणी पोहचत आहे. कित्येकदा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा हा कचरा गटार, नाल्यात टाकला जातो. त्यामुळे गटार तुंबतात, पाणी देखील दूषित होते. ग्रामीण भागात वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची जाळून विल्हेवाट लावली जाते. शहरात वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स कचरापेटीत टाकले जातात. महापालिकेच्या सफाई कामगारांना कचरा वेगळा करावा लागतो. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्समुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो, त्वचेचे रोग होऊ शकतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास देखील धोका निर्माण होतो. सॅनिटरी नॅपकिन्स इन्सिनरेटर मशिनद्वारे नष्ट करता येतात. शहरात, खेड्यात जागोजागी असे मशीन उपलब्ध करण्याची गरज आहे. काही प्रमाणात का असेना याविषयी वाटचाल सुरू झाली आहे. 

सॅनिटरी नॅपकिन्स...महिलांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक आहे. सॅनिटरी नॅपकिन वापराण्यासंदर्भात आता महिलांमध्ये जागृती केली जात आहे. कमीतकमी दरात सॅनिटरी नॅपकिन महिलांना उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणार हा बद्दल सकारात्मक आहे. काही संस्थांमार्फत सॅनिटरी पॅड मोफत देखील दिले जातात. पण या सगळ्यात, वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्समुळे होणारा कचऱ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

जितक्या सहज सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होतात तितक्या सहज ते नष्ट होत नाही. सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्यामुळे पर्यावरण खूप मोठी हाणी पोहचत आहे. कित्येकदा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा हा कचरा गटार, नाल्यात टाकला जातो. त्यामुळे गटार तुंबतात, पाणी देखील दूषित होते. ग्रामीण भागात वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची जाळून विल्हेवाट लावली जाते. शहरात वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स कचरापेटीत टाकले जातात. महापालिकेच्या सफाई कामगारांना कचरा वेगळा करावा लागतो. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्समुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो, त्वचेचे रोग होऊ शकतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास देखील धोका निर्माण होतो. सॅनिटरी नॅपकिन्स इन्सिनरेटर मशिनद्वारे नष्ट करता येतात. शहरात, खेड्यात जागोजागी असे मशीन उपलब्ध करण्याची गरज आहे. काही प्रमाणात का असेना याविषयी वाटचाल सुरू झाली आहे. 

पुणे महानगरपालिका 
पुणे महानगरपालिकेने वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्यात गेल्या चार वर्षात बारा प्रभागांमध्ये इन्सिनरेटर मशीन बसविण्यात आले असून, दिवसाला दहा हजारांहून अधिक पॅडची विल्हेवाट लावण्यात येत आहे. या प्रकल्पाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली आहे. सध्या प्रत्येक प्रकल्पामध्ये दिवसाला सुमारे 750 ते 900 सॅनिटरी पॅड जमा होतात. त्यासाठी कचरावेचकांची स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

सासवड नगरपालिका 
सासवड नगरपालिकेच्यावतीने घराघरातून निर्माण होणाऱया सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्त संकलनासाठी प्रत्येक कचरा संकलन वाहनांवर हायजीन बॉक्सची व्यवस्था करुन पालिकेने स्वच्छतेबाबत मोठी आघाडी घेतली आहे. 

इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईड 
जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने निगडी पोलिस ठाण्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर मशीन बसविण्यात आले. इन्सिनरेटर मशिनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येतात. 

रेड डॉट #RedDot
विकास कोळी यांनी 'रेड डॉट' नावाने एक महत्वाकांक्षी संकल्पना साकारली आहे. लाल रंगाचे वर्तुळ असलेली पिशवी तयार केली आहे. ज्यामध्ये वापरलेले सॅनिटरी नॅपकिन पॅक करून कचरा पेटीत टाकता येतात. त्यामुळे कचरा उचलणाऱ्यांना सॅनिटरी नॅपकिन्स व्यवस्थित वेगळे करता येतील आणि योग्य विल्हेवाट लावली जाईल. अशा पिशव्यांचा वापर महिलांनी करावा यासाठी ते जागृती करत आहेत.

आपण काय करायला हवे? #HealthOfJanani
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्ससाठी रेड डॉट असलेल्या पिशवीचाच वापर करावा. तुमच्या आसपास इन्सिनरेटर मशीन उपलब्ध असल्यास त्याचा नक्की वापर करावा. या उपलब्ध पर्यायांची माहिती जाणकारांना द्यावी. 

Web Title: need for proper disposal of sanitary napkins for environment