

New Marathi Books
esakal
ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांनी प्राचीन महाराष्ट्राचा हा इतिहास सन १९३० ते १९३५ दरम्यान लिहून पूर्ण केला. या ग्रंथात आदिपर्व आणि शातवाहनपर्व आहे. सांस्कृतिक इतिहास, वैदिक वाङ्मयाची संघटना, पौराणिक वाङ्मयाचा विकास याचे विवेचन या ग्रंथात आहे. बुद्धपूर्वकाळच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्थितिची कल्पना या ग्रंथात विस्ताराने मांडली आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना फार मोलाचे वाटेल अशा अशोकाचे गिरनार व सोपारे घौली बैस्ट येथील मूळ लेखांसारख्या काही लेखांचे भाषांतर या ग्रंथात आहे. भारतात भिन्न संस्कृतीचे एकीकरण कसे झाले व ते साध्य करण्यात भारतीयांचे कौशल्य कसे दिसले याचे विवेचन या ग्रंथात आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचे मूलगामी विवेचन करणारा हा दुर्मीळ ग्रंथ संग्रही असावा असा आहे.
वैशिष्ट्य : मूळ संस्कृत लेखांचे भाषांतर, दुर्मीळ छायाचित्रे, नकाशे, संदर्भसूची.
प्रकाशक : वरदा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ११९०, n मूल्य : १५०० रु.