

Marathi Book Review
esakal
भारतीय वन सेवेतून निवृत्त झालेले डॉ. शेषराव सुशिला हिंमतराव पाटील यांचा ‘रानफुले’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने निसर्गाचा भरपूर सहवास लाभलेल्या डॉ. पाटील यांनी वनसंपदा व निसर्गाशी संबंधित केलेल्या अनेक कविता, तसेच इतर विषयांवरील कवितांचाही या संग्रहात समावेश आहे. एकूण १०८ कविता ह्या संग्रहात आहेत. ‘विचारांचा करून विसर्ग अनुभवावा सुंदर निसर्ग, असेल मन शांत जेव्हा तेव्हाच अनुभवाल खरा स्वर्ग...’ पाटील यांच्या कवितेतील ह्या ओळीप्रमाणे निसर्ग अनुभवण्याची व मन शांत करण्याची प्रेरणा, उमेद हा संग्रह वाचकाला देतो, हे निश्चित!
प्रकाशक : साहित्यविश्व प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२८, n मूल्य : २५० रु.