

Moto G57 Power Price and Specs
esakal
भारतात दर आठवड्याला नवे स्मार्टफोन लॉन्च होत असतात. एकीकडे प्रीमियमची क्रेझ वाढत असतानाही मिड-रेंजमधील स्मार्टफोनलाही मोठी मागणी आहे. नुकतेच लावा, मोटोरोला, रिअलमी आणि आयक्यूने नवेकोरे मोबाईल बाजारात आणले.
मोटोरोलाने दोन आठड्यांपूर्वी मोटो जी६७ पॉवर हा मिड-बजेट रेंजमधील मोबाईल सादर केला होता. त्यानंतर आता बजेट रेंजमध्ये मोटो जी ५७ पॉवर हा नवा मोबाईल बाजारात आणला. अवघ्या १३ हजार रुपयांमध्ये तब्बल सात हजार एमएएचची बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन ६एस जेन ४ प्रोसेसर हे या मोबाईलचे खास वैशिष्ट्य. या मोबाईलचा यूजर इंटरफेस आकर्षक असून, एलसीडी डिस्प्लेमुळे स्क्रीनवर ओएलईडीप्रमाणे कलर कॉन्ट्रास्ट होत नाही. किमतीच्या तुलनेत या मोबाईलमधील प्रोसेसर चांगला असला, तरी हाय-एंड गेमिंगवेळी मात्र त्यावर मर्यादा येतात.