नवे वर्ष... नवे कलावंत

आम्ही १९९१ पासून अपवाद वगळता दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत नाटके सादर केली.
new year new actor actress artist shabd sangli theater group
new year new actor actress artist shabd sangli theater groupSakal

‘युवा विचार साहित्य सेवा संघटना’ या संस्थेमध्ये काम करणारे कलावंत प्रदीप कुलकर्णी, शुभदा लेले-पाटणकर, शामेश बुवा, उदय गोडबोले, वैशाली पटवर्धन-सामंत यांनी १९९२ मध्ये नव्या विचाराने एकत्र येत ‘शब्द सांगली’ नावाचा ग्रुप तयार केला.

त्या ग्रुपने राज्य नाट्य महोत्सवाच्या गरजेपोटी सस्नेह कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ या नावाने संस्थेची स्थापना केली. ‘सस्नेह’चे वैशिष्ट्य असे की, जे कलाकार उपलब्ध होतील, त्यांच्यातून योग्य ती निवड करत दरवर्षी नवा चमू बांधत अविरत नाट्य चळवळ जिवंत ठेवली.

- उदय गोडबोले, सांगली

आम्ही १९९१ पासून अपवाद वगळता दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत नाटके सादर केली. ‘रातराणी’, ‘आपलं बुवा असं आहे’, ‘खजिन्याची विहीर’, ‘जास्वंदी’, ‘पाहुणा’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘काळा वजीर पांढरा राजा’, ‘आपण सारे घोडेगावकर’, ‘कन्यादान’, ‘कोण म्हणतं टक्का दिला?, ‘अचानक’,

‘प्लेस विथ पिग्ज सुपारी डॉट कॉम’, ‘सारी रात्र’, ‘महापात्रा’, ‘आपलं आपलं आभाळ’, ‘वंडरलँड’, ‘दि कन्फेशन’, ‘आशानाम मनुष्यनाम’, ‘रक्तबीज’, ‘एक्झिट’, ‘नेक्स्ट’, ‘बाकी शून्य’ आणि ‘सुई धागा’ अशी नाटके सादर केली.

विविध एकांकिका स्पर्धांतून ‘कृष्णाजी केशव कुलकर्णी वर्सेस देशपांडे’, ‘ढग’, ‘कथा दिनूच्या मृत्युपत्राची’, ‘एका संध्याकाळची लव्हस्टोरी’, ‘प्रतिबिंब’, ‘द बूर’, ‘अधे-अधुरे’, ‘वडवानल’, ‘साठा उत्तराची कहाणी’, ‘वन सेकंद लाइफ’,

‘गप्पा’ आदी एकांकिकांचे सादरीकरण राज्यासह बेळगाव, बंगळूर आदी ठिकाणी केले. एकांकिका सादरीकरणाच्या विविध स्पर्धांतून संस्थेने जवळपास ३०० हून अधिक पारितोषिके प्राप्त केली आहेत.

संस्थेच्या विविध नाटकांतून अनेक कलाकार चमकले. फक्त रौप्यपदकाचा विचार केला तर प्राची गोडबोले, रेणू पाठक, मोहन देशपांडे, वैशाली खरे, अभय कुलकर्णी, प्रसाद बर्वे, जुई बर्वे, उदय गोडबोले, मनीषा काळे, रेणुका शहा यांचा रौप्य पदक विजेत्यांत समावेश आहे,

तर राज्य बालनाट्य स्पर्धेमधून राजस बर्वे, गंधार खरे आणि तन्वी खाडिलकर यांनी देखील रौप्य पदके पटकावली आहेत. नाट्यक्षेत्रात नवी पिढी तयार व्हावी, या उद्देशाने ‘सस्नेह’ १९९२ पासून बालनाट्य शिबिर घेत आहे. यातूनच जुई बर्वे, चित्रा खरे असे बालकलाकार घडले, जे मोठेपणी टीव्ही मालिकांमध्ये चमकले.

रेडिओवरील सध्या गाजणारे सुप्रसिद्ध ‘बाबूराव’ अर्थात यशवंत कुलकर्णी हे याच शिबिराचे विद्यार्थी. अगदी अलीकडच्या काळात या बालनाट्य शिबिरांची जागा ‘सॅटर्डे थिएटर’ या संस्कार भारतीच्या सहकाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या बालनाट्य प्रशिक्षण उपक्रमाने घेतली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य नाट्य महोत्सवामध्ये ‘एका झाडाची गोष्ट’, ‘ब्ल्यू व्हेल’ आणि ‘व्हाईट रोझेस’, ‘प्रोजेक्ट मैत्रबंध’, ‘आम्ही झाड झालो’ ही सर्व नाटके कोल्हापूर, पुणे या केंद्रांतून जवळपास ८० बालनाट्यांतून अंतिम फेरीमध्ये पोहोचली.

हा एक विक्रमच आहे. अंतिम फेरीमध्ये देखील त्यांना पारितोषिके प्राप्त झाली. सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक उदय गोडबोले यांच्या ‘एका झाडाची गोष्ट’ला मिळाले. याशिवाय याच उपक्रमातून ‘वीज पेरूया अंगात’ आणि ‘अंतराळातील स्वर्ग’ अशी बालनाटके देखील सादर करण्यात आली.

संस्थेने या तीस-एक वर्षांत ३०० हून अधिक बक्षिसे पटकाविली. अन्य बक्षीसपात्र आणि सहभागी कलाकारांमध्ये मंदार खरे, विश्वजित देशपांडे, अनघा जोशी-देशपांडे, सुप्रिया उकिडवे, शिरीष उकिडवे, राजा पंडित, अमोद मराठे, मेहुल परचुरे, विजय फडके, प्रसाद गद्रे, शशांक लिमये, चंद्रकांत जाधव, योगेश वाटवे, दिनेश म्हसकर,

रवी कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, कल्याणी खाडिलकर, क्षितिजा केळकर, अश्विनी खाडिलकर, धनंजय खाडिलकर, विवेक देशपांडे, सुनीता पाटणकर, सचिन कुलकर्णी, रश्मी कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, प्राची देशपांडे, नीता जोशी,

प्रभाकर गुरव, प्रशांत गोखले, मिलिंद कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, उदयन आपटे, तुषार आपटे, चंद्रकांत धामणीकर, हरिहर म्हैसकर, अमिता इनामदार, विजय कुलकर्णी, मृण्मयी काळे, प्रवीण इंदोलीकर, तन्मयी गोडबोले, मृणाल कुलकर्णी,

मृणाल जोशी, ओंकार कुलकर्णी, गौतमी कुलकर्णी, प्राजक्ता मराठे, विलास गुप्ते, पांडुरंग जोशी, ज्योती, रेवती, जुई कावेरी, प्रांजली कुलकर्णी, मेधा केळकर, दीपक पवार, कै. काका ठाकूर, कै. उमेश साने, कै. हेमंत जोशी , कै. गिरीश जोशी आदींचा समावेश होता.

निर्भय सुचेता विसपुते, प्रसाद कुलकर्णी, अनुश्री ओगले, सावनी कुलकर्णी, समीर गद्रे, सानित कुलकर्णी, सानिका खरे, अमेय फाळके, अश्विनी अमित खाडिलकर अशा सांगलीतील अनेक कलाकारांनी स्टेजवरची किंवा स्टेजच्या मागील जबाबदारीची कारकीर्द संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आणि आज ते वेगवेगळ्या संस्थांतून अतिशय चांगल्या पद्धतीने नाट्यकलेची सेवा करीत आहेत.

संस्थेचा लौकिक वाढवण्यात यापेक्षाही अनेकांचे योगदान आहे. त्या सर्वांचाच इथे नामोल्लेख करणे शक्य झालेले नाही. त्यांच्या स्नेहातूनच ‘सस्नेह’चा नाट्यप्रवास अखंड आहे. आज तुटपुंजी साधनसामग्री, मनुष्यबळ आणि आर्थिक ताकदीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाटकाचा आनंद नव्या पिढीला समजेल आणि ती पुन्हा इकडे येईल, असा आशावाद ठेवूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com