
'कोकणात शेती म्हणजे तोट्यातला धंदा' ही व्याख्याच निवजे (ता. कुडाळ) या गावाने बदलून टाकली. शेती आणि पूरक व्यवसायांतून गेल्या दहा-पंधरा वर्षांत या गावाने आपला चेहराच बदलला आहे. सह्याद्रीच्या रांगांतील निवजे आता देशभरातील अभ्यासकांसाठीही कुतूहलाचा विषय बनले आहे.