chambal
sakal
दिल्ली- नगर- पुणे प्रवासात चंबळ नदी लागते... मी माझी डायरी काढली, जी पहिल्या वर्षाला आम्हाला लिहायला सांगितली होती. नंतरही मी लिहीत होतो अधूनमधून... जशी चंबळ नदी आली. मी माझी डायरी फाडून, तुकडे तुकडे करून चंबळच्या नदीत फेकून दिली. सगळा आठवणींचा अवकाश चंबळला अर्पण! नंतर बऱ्याच वेळा चंबळवरून गेलो. आठवणींचे कागद शोधत राहिलो. चंबळच आहे ती, सगळं सामावून घेते.