One Life movie : ‘वन लाईफ’ चित्रपट: संवादांच्या पलीकडील कॅमेऱ्याची जादू

Impact of Nicholas Winton's life in James Hawes’ One Life : ‘वन लाईफ’ चित्रपटातून एका माणसाच्या एका कृतीने किती जीव वाचू शकतात, हे जाणवते. अँथनी हॉपकिन्सच्या अभिनयाने प्रेक्षकाला नायकाच्या विचारांचा साक्षीदार बनवते. दृश्य माध्यमाने सांगितलेली ही कथा इतिहास आणि मानवीतेची महत्त्वाची शिकवण देते.
Impact of Nicholas Winton's life in James Hawes’ One Life

Impact of Nicholas Winton's life in James Hawes’ One Life

sakal

Updated on

जेम्स हॉज दिग्दर्शित ‘वन लाईफ’ चित्रपट म्हणजे एका आयुष्यात माणूस काय काय करू शकतो, याची अनुभूती आहे. एका व्यक्तीच्या एका कृतीमुळे किती जणांच्या आयुष्यामध्ये फरक पडू शकतो, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघायला हवा.

कमीत कमी संवाद आणि दृश्य माध्यमाचा वापर करून कॅमेऱ्याचा केलेला अर्थपूर्ण वापर हे उत्तम चित्रपटाचे एक लक्षण चित्रपटातील सुरुवातीच्या काही शॉटमधून लक्षात आले, की आपण अजाणतेपणे चित्रपटामध्ये ओढले जातो. ‘वन लाईफ’ चित्रपटाच्या सुरुवातीला लहान मुलांचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपण नायक अँथनी हॉपकिन्सच्या नजरेतून बघतो. अनेक फोटोंचे प्रतिबिंब वयस्कर नायकाच्या चष्म्यामध्ये दिसते आणि नायक काय विचार करत असेल, याचा विचार प्रेक्षक करतात. अनेक फोटो बघता बघता नायक भानावर येतो, जे आपल्याला कारच्या आरशामध्ये दिसते. नायक कार चालवता चालवता आपल्या घरी पोहोचतो, तेव्हा १९८७ वर्ष उजाडलेले असते. घरी आल्यानंतर तो रेडिओ सुरू करतो, बीबीसी न्यूज ऐकतो. ऐकता ऐकता स्वतःची कामे स्वतः करतो, म्हणजे तो या वयातही सक्रिय आहे, हे दिसते. शेअर इंडेक्स कोसळल्याचे ऐकताच नायक निकोलस त्यावर प्रतिक्रिया देतो, याचा अर्थ त्याला शेअर मार्केटची जाण आहे. ब्रिटनमध्ये तमिळ स्थलांतरितांची मागणी ऐकल्यानंतर नायक विचार करू लागतो. एकूणच चित्रपटामध्ये जी दृश्ये दिसतात, ती सर्व दृश्ये अर्थपूर्ण आहेत. बऱ्याच जुन्या आठवणींचा पसारा निकोलसच्या खोलीमध्ये अस्ताव्यस्त पडला आहे; परंतु तो त्या आठवणींमध्ये रममाण नाही, त्या विचारांचा त्याला त्रास होत आहे, हे दृश्य माध्यमातून आपल्याला जाणवते. काही मुलांना रेल्वेमधून कुठेतरी पाठवले जात आहे, कोण आहेत ही मुले, ज्यांच्या आठवणी स्विमिंग टँकमध्ये पोहोतानासुद्धा निकोलसला त्रास देत आहेत?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com