

अनिल खेडकर
महाराष्ट्रातील संतपरंपरा, अध्यात्म आणि विठुरायाची महती जगभर पोहोचावी यासाठी पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन अशी दिंडी काढण्यात आली आहे. अलीकडेच या दिंडीने लंडनच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. सत्तर दिवसांचा खडतर प्रवास करत विठुरायाची दिंडी २१ जून रोजी लंडनमध्ये पोहोचणार आहे.