
पंकज अडवाणी अन् बिलियर्ड्स, स्नूकर हे समीकरण सर्वश्रुत आहे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पंकज या खेळाशी संलग्न आहे. वयाच्या ३९व्या वर्षीही त्याचा उत्साह कमी झालेला नाही. २५पेक्षा अधिक जागतिक स्पर्धा जेतेपदे... आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके... आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत घवघवीत यश... अन् ३४ राष्ट्रीय जेतेपदे... अशी कारकीर्द गाजवल्यानंतर आता पंकजला हा खेळ आणखी मोठा व्हावा, असे मनापासून वाटते. या खेळाची टेलिव्हिजन लीग सुरू व्हावी, असे तो ‘सकाळ’शी संवाद साधताना म्हणाला.