Paresh Maity Artist : एका माध्यमात न अडकता कलेचे नवे क्षितिज शोधणारे परेश मैती

Paresh Maity Paintings : पश्चिम बंगालमधील छोट्या गावातून सुरू झालेला परेश मैती यांचा कलाप्रवास आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे. चित्रकला, शिल्पकला आणि इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून ते सतत नवनिर्मितीचा आनंद शोधतात.
Paresh Maity Paintings

Paresh Maity Paintings

esakal

Updated on: 

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

पश्‍चिम बंगालमधील एका छोट्या खेड्यात राहणारे परेश मैती मातीची खेळणी बनवता बनवता चित्रकार झाले. रंगाचे माध्यम बदलत गेले, पण त्यांचा उत्साह आणि नवनिर्मितीचा आनंद कायम राहिला. सतत काहीतरी करत राहणे आणि नावीन्याचा शोध घेणे ही त्यांची आदिम प्रेरणा आहे.

परेश मैती हे बंगालमधील एका छोट्या गावापासून ते म्युझियम, आर्ट गॅलरी आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांना वाटणाऱ्या सृजनाचा दरवळ जगभर पसरवत आहेत. ते हिंदुस्थानातील एक जानेमाने कलावंत आहेत. ते सात वर्षांचे असताना एक मातीची मूर्ती घडताना ज्या औत्सुक्याने त्यांनी पाहिले त्याच बालसुलभ वृत्तीने पेंटिंग, शिल्पकला, भित्तिचित्रे आणि इन्स्टॉलेशन या सर्व क्षेत्रांत काम करत ते आले आहेत. त्यांना विचारा तर खरे, तुम्हाला आयुष्यात सर्वांत भुरळ कशाची पडली आहे. ते लगेच सांगतात, की कलेच्या अमर्याद शक्यतांची.

ते काहीही रंगवत असोत - नदीकाठची पहाट, एक गजबजलेले शहर, राजस्थानमधली रंगांची उधळण किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणासाठी भव्य शिल्प तयार करत असोत, हे सारे त्यांचे कुतूहल आणि शोधवृत्ती सांभाळूनच. जणू ते नवशिकेपणाने काम करत आहेत, अशाच वृत्तीने ते आज चाळीस वर्षांच्या कामानंतरही त्याच उत्साहाने बोलत असतात. त्यामुळे कदाचित ते एकाच माध्यमाला चिकटून राहू शकत नाहीत. या इतक्या वर्षांत ते वॉटर कलर, ऑइल पेंटिंग आणि ॲक्रेलिक फक्त नव्हे तर नाजूक व्यक्तिचित्रण असो की भव्य शिल्पे किंवा सिरॅमिक्स असो किंवा सार्वजनिक ठिकाणाची इन्स्टॉलेशन. या सर्वांत ते सहजतेने रमतात. त्यांची पेंटिंग जगभर घेतली जातात आणि त्यांची शिल्पे विमानतळ सुशोभित करतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या कार्यालयात आणि त्यांच्या मोकळ्या जागेत ती दिसतील. जेणेकरून त्यांच्या कलाकृती गॅलरीबाहेर पसरलेल्या आहेत आणि या यशस्वी कार्यामागे त्यांची बालसुलभवृत्ती डोकावणं कधी थांबत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com