New Marathi Book : नव्या मराठी पुस्तकांची बहुरंगी मेजवानी; कादंबरी, ग्रामजीवन, आयुर्वेदाचार्य जीवक आणि बसवेश्‍वरांचे वचने

Pune book releases : पुणे नवी पुस्तके: लग्नसंस्था, ग्रामीण आठवणी, आयुर्वेद आणि संतवचने उलगडणाऱ्या मराठी वाचनप्रेमींसाठी खास पुस्तकांची ओळख.
New Marathi Book

New Marathi Book

esakal

Updated on

कंगनम्

तमिळ लेखक पेरुमाल मुरुगन यांची ‘कंगनम्’ ही कादंबरी सामाजिक सुखान्तिका नाही. मात्र, ते एका सामाजिक प्रश्‍नावर केलेलं भाष्य आहे. त्याचप्रमाणे तो एका व्यक्तीचा व्यक्तिगत प्रवास आहे. जीवनातील लग्न ह्या एका महत्त्वाच्या वळणाला असलेले नानाविध कंगोरे या कादंबरीतून मांडण्यात आले आहेत. पितृसत्ताक समाजव्यवस्था, सामाजिक असमानता, जमिनीशी व आपल्या समाजाशी बदलत चाललेले नातेसंबंध यांचाही लग्नसंस्थेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कसा प्रभाव पडतो हे लेखकाने अचूकपणे दाखवून दिले आहे. वरवर सुखान्तिका वाटत असलेल्या या कादंबरीत लेखकाने ‘लग्न’ या विषयाच्या गाभ्याची अत्यंत कठोरपणे चिकित्सा केली आहे. ती वाचकाला खिळवून ठेवते. सुनीता कट्टी यांनी कादंबरीचा अनुवाद केला आहे.

  • प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे

  • पृष्ठे : ३१२ n  मूल्य : ४९५ रु.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com