

Maratha history figures
esakal
पहिले बाजीराव हे आपल्या महाराष्ट्रातले अतिशय मौल्यवान रत्न. त्यांच्याविषयी सर्वसामान्यांप्रमाणे अनेक इतिहास अभ्यासकांनादेखील एक जबरदस्त कुतूहल आहे. त्यांचे निधन खान्देश-माळव्यातल्या नर्मदा तटावरच्या रावेरखेडी या छोट्याशा गावी झाले. तिथेच त्यांची समाधी आहे.
आपल्या महाराष्ट्राच्या भूमीने अनेक शूर योद्ध्यांना जन्म दिला. त्यातले एक महत्त्वाचे नाव म्हणजे पहिला बाजीराव पेशवे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी बाजीराव पेशवे यांनी पेशवेपदाची वस्त्रं परिधान केली; पण त्यांना आयुष्य मिळालं केवळ ४० वर्षांचं. या अल्पशा कारकिर्दीत त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. मराठेशाहीचा साम्राज्य विस्तार केला. ज्यांनी कधी पराभव पाहिला नाही, ज्यांनी आपल्या मनगटानं दिल्ली काबीज केली आणि इराणपर्यंतच्या पातशाह्या हलवल्या त्या बाजीरावांचे निधन खान्देश-माळव्यातल्या नर्मदा तटावरच्या रावेरखेडी या छोट्याशा गावी २८ एप्रिल १७४० रोजी झाले. अंतराने आपल्या महाराष्ट्रापासून दूर असलेली तरीपण करायलाच हवी या दृष्टीने बाजीरावांच्या समाधीची केलेली ही सफर.