Arctic Climate Change: आर्क्टिकमधील पीटरमॅन हिमनदी: तरंगत्या बर्फपट्ट्यांतून बदलत्या पृथ्वीच्या संतुलनाची जिवंत खूण

Petermann Glacier’s Melting Ice Shelf Signals Shifting Global Balance : आर्क्टिकमधील पीटरमॅन हिमनदीचा तरंगता बर्फपट्टा, समुद्रतळाशी होणारे वितळण आणि तुटणारे प्रचंड हिमखंड यांमधून बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या समुद्रपातळीचा इशारा
Beyond Himalayas: Understanding the Unique Dynamics of Arctic Glaciers

Beyond Himalayas: Understanding the Unique Dynamics of Arctic Glaciers

Sakal

Updated on

उमेश झिरपे, umzirpe@gmail.com

आर्क्टिकमध्ये हिमनदी पर्वतांमध्ये अडकून राहत नाही; ती समुद्रापर्यंत पोहोचते आणि तिथे तिचा प्रवास संपत नाही, तर एका नवीन स्वरूपात सुरू राहतो. बर्फ समुद्रावर तरंगू लागतो आणि त्या तरंगत्या भागाला ‘आइस शेल्फ’ किंवा बर्फपट्टा म्हणतात. ग्रीनलँडमधील पीटरमॅन हिमनदी ही अशा प्रकारच्या हिमनद्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाची हिमनदी आहे.

हिमालयात उभं राहिलं की बर्फाचा एक वेगळाच अर्थ समजतो. वरती शांत दिसणारा, सूर्यप्रकाशात चमकणारा तो बर्फ प्रत्यक्षात संथ गतीने वाहत असतो. गंगोत्री, खुम्बू किंवा मिलम यांसारख्या हिमनद्या पाहताना आपल्याला बर्फाची नदी दिसते - पर्वतांच्या कुशीत जन्म घेणारी, दऱ्यांतून पुढे सरकणारी आणि शेवटी नद्यांना जन्म देणारी; पण पृथ्वीवरील हिमनद्यांचा हा फक्त एक भाग आहे. जेव्हा आपण हिमालयाच्या पलीकडे, पृथ्वीच्या उत्तर टोकाकडे - आर्क्टिक प्रदेशाकडे - पाहतो, तेव्हा हिमनद्यांचे एक वेगळे, अधिक विशाल आणि अधिक गुंतागुंतीचे रूप समोर येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com