

Modern Indian Art History
esakal
‘चिन्ह’ प्रकाशनातर्फे येत्या आठ एप्रिलला (बुधवार) चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘बरवे संचित’ हा विशेष ग्रंथ प्रकाशित होत आहे. या ग्रंथाची प्रस्तावना जयंत भीमसेन जोशी यांनी लिहिली असून, त्याचा संपादित अंश...
बरव्यांना मी कधी प्रत्यक्ष भेटलो नाही परंतु चित्रकलेच्या प्रेमात पडल्यापासून त्यांच्या चित्रांद्वारे आणि प्रांजळ लिखाणातून ते मला नेहमी भेटत राहिलेले आहेत. त्यांच्या पेंटिंग्जनी मला आकर्षित केले आहे आणि नव्या वाटा दाखवल्या आहेत. आजही त्यांच्या ड्रॉइंग्ज आणि पेंटिंग्जकडे पाहताना, चित्रातले आधी न दिसलेले बारकावे उलगडत जातात आणि मी स्तिमित होतो. हा ग्रंथ पाहताना आणि वाचताना मला नवे आनंदनिधान गवसले, बरव्यांच्या आंतरजीवनाबद्दल, कलाप्रक्रियेबद्दल नवीन काही मोलाचे समजले. याबद्दल मी या प्रगल्भ, श्रीमंत ग्रंथाच्या निर्मितीमधे सहभागी असणाऱ्या साऱ्यांचा ऋणी आहे. मी इथे लिहिलेल्या या शब्दांपेक्षा बरेच काही जपण्यासारखे, बहुपर्यायी आणि अर्थवाही या ग्रंथामधे वाचकांना मिळणार आहे हे निश्चित.