वेध साताऱ्यातील कर्तृत्ववानांचा...

साताऱ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा 'प्रकाशरेषा' या पुस्तकात घेतला आहे. श्रीकांत कात्रे यांच्या पत्रकारितेतील संवेदनशील दृष्टीकोनातून उलगडलेली ही कथा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते.
Inspiring Stories
Inspiring Stories sakal
Updated on

अरुण गोडबोले

editor@esakal.com

‘सकाळ’ पुण्याबरोबरच साताऱ्यातही लोकप्रिय अग्रेसर वृत्तपत्र आहे. निःस्वार्थी व सक्षम पत्रकार ही सकाळची तेव्हा आणि आजही मोठी ताकद. श्रीकांत कात्रे हेसुद्धा त्याच मुशीतील पत्रकार. ते सातारचे असल्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य व महत्त्व त्यांना माहीत होते. त्यातूनच २००१ मध्ये त्यांना सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून देणारी मालिका सकाळमधून लिहिता आली. त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांमुळे त्या मालिकेचे यथार्थ नामानिधान प्रकाशरेषा असे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com