

K-Connection Short Stories
esakal
मराठी साहित्यामध्ये आठवणींपर लेखन किंवा व्यक्तिचित्रणात्मक लेखन नवं नाही, मात्र यामध्ये बऱ्याच वेळा स्मरणरंजन किंवा त्या पिढीची मूल्ये, तो काळ सांगण्याचा प्रयत्न जास्त असतो. किंबहुना अशा कथा किंवा लेख बऱ्याच वेळा त्या काळाचा आलेख मांडत असतात. या पार्श्वभूमीवर प्रणव सखदेव या लेखकाचा ‘के कनेक्शन’ हा कथासंग्रह भूतकाळाचा आणि वर्तमानकाळाचा सांधा अत्यंत चपखलपणे जोडतो. यातल्या कथांमधील पात्रे जरी आपला भूतकाळ सांगत असली, तरी एकाच वेळी वर्तमानकाळातील प्रतिमांशी त्याचं नातं जोडत कथेतला आशय अधिक स्पष्ट करतात. आंब्याच्या शीतपेयाच्या जाहिरातीमधील कॅटरिना कैफचा अभिनय आणि कथेतील ती घटना म्हणजेच भूतकाळातील घटना याचा सांधा जोडत, कथेतील एका पात्राच्या आनंदाची अवस्था कशी होती हे लेखक येथे स्पष्ट करतो.