

Women's Empowerment in India
esakal
स्त्रीवादाबाबत गेल्या काही वर्षांत परिस्थिती थोडी बदलली आहे हे खरं, पण ती पुरेशी नाही... आणि तीही कशामुळे?... तर स्त्रियांनी आम्हालाही समान संधी हवी, हे हिरिरीने मांडल्यामुळे आणि कृती केल्यामुळे. जोवर समसमान संधींचा अवकाश साध्य होणार नाही, तोवर महिला दिन असणारच, तो असलाच पाहिजे आणि हे ज्यांना मान्य आहे, त्या पुरुषांनीही साजरा केला पाहिजे.
प्राध्यापक : स्त्री-सशक्तीकरण म्हणजे काय, कोण सांगेल?
वर्गात चिडिचूप शांतता.
प्राध्यापक : स्त्री-सशक्तीकरण म्हणजे महिलांना अशी शक्ती प्रदान करणे, ज्यामुळे ती आपापले निर्णय घेऊ शकेल... सर सांगू लागतात. एक विद्यार्थी उभा राहतो आणि विचारतो, ‘सर पुरुष-सशक्तीकरण का नसतं?’ वर्गात एकच हशा पिकतो... ‘स्थळ’ या चित्रपटातला हा प्रसंग पाहिला आणि मला मीच आठवलो... अकरावीत असताना मलाही असाच प्रश्न पडला होता, महिला दिन असतो तसा पुरुष दिन का नसतो?