

Inspirational Marathi Books
esakal
आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्यांचे यश सर्वांना दिसते. पण त्यामागचा खडतर प्रवास व तपश्चर्या फार कमी लोकांना माहीत असते. आपण किती अडचणीत आहोत, आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो आहे, कितीही कष्ट केले तरी पदरात काहीच पडत नाही असे अनेकांना वाटते. मग निराश होऊन ते सगळं सोडून देतात व नशिबाला दोष देत आयुष्य घालवतात. मात्र, अशा काही यशस्वी व्यक्तीही असतात की, त्यांच्या बालपणापासूनचा प्रवास आपण बघितला तर आपले कष्ट, दुःख त्यापुढे काहीच नाही हे जाणवतं. हाच अनुभव घ्यायचा असेल, तर ‘प्रांजळाचे आरसे’ या पुस्तकाचे दोन खंड प्रत्येकाने वाचायला हवेत. यात ३६ व्यक्तिमत्त्वांचा यशापर्यंतचा टप्पा सविस्तरपणे शब्दबद्ध करण्यात आला आहे. या लेखनात काल्पनिक काहीही नसून त्या व्यक्तींशी प्रत्यक्ष बोलून ते वाचकांपुढे मांडण्याचं काम करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, सर्वांच्या प्रदीर्घ मुलाखती घेऊन खंडांची निर्मिती केलेली आहे.