Mahabharata Character Analysis : महाभारतातील भीष्म, धृतराष्ट्र, विदुर, द्रौपदी व कुंती : व्यक्तिरेखांच्या सखोल विश्‍लेषणाचा नवा मराठी ग्रंथसंच

Indian Mythology Character Studies : महाभारताचे पंचप्राण! भीष्म, धृतराष्ट्र, विदुर, द्रौपदी आणि कुंती; मानवी मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या पाच महान व्यक्तिरेखांवर आधारित 'प्रसाद प्रकाशन'चा विशेष पुस्तक संच.
Mahabharata Character Analysis

Mahabharata Character Analysis

esakal

Updated on

गणाधीश प्रभुदेसाई - ganadhish.prabhudesai@esakal.com

महाभारत हे भारतातील एक प्राचीन आणि महान महाकाव्य आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धाभोवती फिरताना धर्म-अधर्म, कर्तव्य, नातेसंबंध आणि मानवीमूल्यांचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन महाभारत घडवते. पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्षातून जीवनातील गुंतागुंतीचे तत्त्वज्ञान उलगडले जाते. महाभारत आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. सर्वकालीन मार्गदर्शक अशी ‘गीता’ या महाभारतातूनच मानवजातीसमोर आली आहे. द्यूतामध्ये पांडवांचे हरणे, द्रौपदीचे वस्त्रहरण, पांडव-कौरवांमधील युद्ध.... यापुरतेच महाभारत मर्यादित नसून यातील प्रत्येक पात्र मनुष्याला एक वेगळी शिकवण देणारे आहे. सखोल अभ्यास केल्यास एक वेगळे ‘विश्‍वरूपदर्शन’ यातून घडू शकते आणि ही संधी मराठी वाचकांना मिळाली आहे. ‘भीष्म’, ‘धृतराष्ट्र’, ‘कुंती’, ‘द्रौपदी’ व ‘विदुर’ या महाभारतातील पाच व्यक्तिरेखा पाच पुस्तकांतून वाचकांच्या भेटीस आल्या आहेत. प्रसाद प्रकाशनाने हा संच प्रकाशित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com