#mokalevha  जगण्याची आशा खोटी ठरते तेव्हा...

#mokalevha  जगण्याची आशा खोटी ठरते तेव्हा...

“माझी तर जगण्याची इच्छाच संपून गेली आहे. काही दिवसांपूर्वी एका आशेवर मी जगत होतो, की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल. पण ती आशा खोटी ठरली.” एक चाळीस वर्षांची व्यक्ती डोळ्यांत अश्रू आणून सांगत होती.

“आपल्या आयुष्यातले सर्वच दिवस एकसारखे नसतात. कधी ते साधे, सुंदर, सहज आपल्याला हवे तसे आनंद देणारे असतात. तर कधी ते अडचणीचे, कठीण, आघातपूर्ण, दु:खदायक असतात. अशा वेळी त्यांचा सामना करताना छळ, क्लेश, वेदना तर कधी राग, तणाव, चिंता, यासारख्या नकारात्मक किंवा हानिकारक भावनांना आपण बळी पडतो आणि मग निराशेच्या महासागरात असहायपणे गटांगळ्या घेतो. त्यावेळी ही परिस्थिती अटळ आहे असेच आपण मानतो.”

“मलाही असेच वाटते. मी हेच अनुभवत आहे सध्या.” त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होते, तर मनात गोंधळ होता.  

“तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडावे ही तुमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे तुमचे आयुष्य उत्तम होईल ही तुमची आशा आहे. अपेक्षेमध्ये कृती अपेक्षित आहे आणि आशेमध्ये त्या कृतीचा सकारात्मक परिणाम अपेक्षित असतो. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर आपण असमाधानी होतो पण आशा पूर्ण नाही झाली तर आपण निराश होतो. शिवाय अपेक्षेमध्ये आपल्या नकळत आपण स्वत: आणि दुसऱ्यांनी काय करावे हे ठरवत असतो.”

त्याने मान डोलवली.

“पण तुमचे आयुष्य कोणीतरी चांगले घडवावे ही अपेक्षा कशाला? इथे कोणीतरी म्हणजे दैव किंवा नशीब असेही आपण म्हणू शकतो. त्यापेक्षा तुमची जी आशा आहे त्यावर तुम्हीच कृती केली पाहिजे.”

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“पण म्हणजे नेमके काय करायचे?” 

“तुमची परिस्थिती अटळ आहे, अशी तुमची खात्री होत असतानाच मनात एकीकडे एक आशेचा कोंब तुम्हाला धीर द्यायला पुरेसा ठरला.” 

“हो पण ‘ती आशा’ खोटी तर ठरणार नाही ना, या विचाराने मी परत निराश झालो. म्हणजे आशा करण हेही वाईट म्हणावे लागेल.”

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“अजिबात नाही. पण फक्त आशा करून ती कोणीतरी पूर्ण करेल ही अपेक्षा बाळगणे वाईट. सर्वप्रथम स्वत:वर विश्वास ठेवूया, की आपण आपली आशा आपल्या प्रयत्नांनी पूर्ण करू. आपल्या प्रगतीच्या मार्गातले तीन मोठे शत्रू आहेत - शंका, चिंता आणि भीती! या तिन्ही शत्रूंना आपल्या मनातून हुसकावून बाहेर काढायला हवे. असे झाले तर आपण मोकळेपणाने श्वास घेऊन मन शांत आणि स्थिर करू शकू. मग आपल्या मार्गावरील असलेल्या विविध संधी पाहू शकू. आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यानुसार कृती करणे आवश्यक असते. हातावर हात धरून नशीब बदलेल याची वाट न बघता सकारात्मक आणि आनंदी होऊन आपल्या आशेच्या किंवा स्वप्नांच्या अनुसरून कृती केली तर आशा नक्की लवकर फळाला येईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com