दारव्हा तालुक्यातील लाडखेड छोटेसे गाव. भाजीपाला शेतीने हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे दिसते. रताळे उत्पादनाच्या प्रयोगातून या गावाची विदर्भच नव्हे तर राज्यातही ओळख आहे. गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला लागवडीचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाला असून यवतमाळ शहर, जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर भाजीपाला पुरविणारे गाव म्हणून ‘लाडखेड’ नावारूपास आले आहे.