Diwali cyber scams: दिवाळीच्या प्रकाशात सायबर गुन्ह्यांवर मात!

दिवाळीत खरेदी वाढत असल्याने सायबर गुन्हेगार बनावट ऑफर्स, फिशिंग आणि डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करतात. म्हणून ऑनलाइन व्यवहारांपूर्वी टू-फॅक्टर सेटिंग करणे आणि संशयास्पद लिंक्स टाळणे अत्यावश्यक आहे
Diwali cyber scams

Diwali cyber scams

esakal

Updated on

दिवाळीनिमित्त सध्या सगळीकडे खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष बाजारपेठ असो वा ऑनलाइन खरेदी, सणासुदीच्या या काळात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. हीच संधी साधत सायबर गुन्हेगार तुमच्या खिशावर डल्ला मारण्यास तयारच असतात. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवनवीन कपडे, फराळ, फटाके, तसेच विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. त्यातच केंद्र सरकारने नुकतेच जीएसटी करपुनर्रचना केल्याने जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीनिमित्त देशभरात आर्थिक उलाढाल वाढणार असल्याचा अंदाज कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) संस्थेने वर्तविला आहे. मागील वर्षी देशात दिवाळीवेळी ४.७५ लाख कोटींची उलाढाल झाली होती, यंदा मात्र जीएसटी कमी झाल्याने हा आकडा पाच लाख कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा स्वातंत्र्यानंतरची सर्वात जास्त उलाढाल होणारी दिवाळी असेल, असाही अंदाज सीएआयटीने व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com