चिखलदरा तालुक्यातील राहू हे जेमतेम ६५० लोकवस्तीचे गावं. सातपुड्याच्या कुशीत महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर हे गाव वसलयं. अमरावती या विभागीय शहरापासून तब्बल १३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या राहू या गावाने बांबूविक्रीने आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.