
विख्यात अभिनेता-दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दीची सांगता नुकतीच (ता. १४ डिसेंबर) झाली. त्यानिमित्त...
संगीतकार शंकर-जयकिशन यांच्यातल्या जयकिशन यांचं निधन झाल्यानंतर राज कपूर म्हणाला होता, ‘माझ्या जीवनातलं संगीत गेलं.’ नंतर काही दिवसांनी गायक मुकेश गेला. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, ‘माझा आवाज गेला.’ कवी शैलेंद्र गेल्यानंतर राजची प्रतिक्रिया होती, ‘माझ्या जीवनातलं काव्य गेलं.’