सोशल मीडियावरचं गाजलेलं... (राजेश मंडलिक)

राजेश मंडलिक rmandlik87@gmail.com
रविवार, 18 जून 2017

टू बी ऑर नॉट टू बी?

टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्‍चन!
लॉगिन असावं, की डिॲक्‍टिव्हेट व्हावं हा एकच सवाल आहे

या सोशल मीडियाच्या कचराकुंडीत
एका पोस्टचा थ्रेड पकडून
नाचावं उसन्या आनंदाने,
की खोटं रडावं, चिडावं
अन्‌ मग फेकून द्याव्यात त्या भावना
कुठल्या तरी सर्व्हरमध्ये सडत राहण्यासाठी.
...आणि मग करावा लॉगआउट
एकाच क्‍लिकने
व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम अन्‌ फेसबुकचासुद्धा?

टू बी ऑर नॉट टू बी?

टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्‍चन!
लॉगिन असावं, की डिॲक्‍टिव्हेट व्हावं हा एकच सवाल आहे

या सोशल मीडियाच्या कचराकुंडीत
एका पोस्टचा थ्रेड पकडून
नाचावं उसन्या आनंदाने,
की खोटं रडावं, चिडावं
अन्‌ मग फेकून द्याव्यात त्या भावना
कुठल्या तरी सर्व्हरमध्ये सडत राहण्यासाठी.
...आणि मग करावा लॉगआउट
एकाच क्‍लिकने
व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम अन्‌ फेसबुकचासुद्धा?

इथल्या जात्यंधतेच्या नागाने
असा डंख मारावा
की भिनत जावं ते विष
हळूहळू
अन्‌ त्यातून कधी बाहेर पडू
लागलो तर...

इथेच तर मेख आहे
खऱ्या आयुष्यातल्या आव्हानांशी
दोन हात करण्याची ताकद नसते
म्हणून आम्ही खेळत असतो
लुटुपुटू खूश होणं अन्‌ चिडणं
कधी सहन करतो, कधी वार करतो
खोटेपणाचा मुखवटा चढवून!

...आणि अखेर असाह्यतेचं बोट वापरून
क्‍लिक करतो लॉगिन होण्यासाठी
आमच्याच मारेकऱ्याच्या साईटवर!

हे मार्कंडेया, तू इतका चालू कसा निपजलास?
एका बाजूचे मित्र आम्हाला ‘बॉर्डरवर जा’ म्हणून हिणवतात,
तर दुसऱ्या बाजूचे मित्र ‘एसीत बसू नका’ म्हणून ओरडतात
मग आभासी जगाला चटावलेलं हे मन घेऊन
हे झुकेरबर्गा
आम्ही डबल ढोलकीवाल्यानी
कोणा साइटच्या लॉगिनमध्ये बोट खुपसायचं?
कोणत्या लॉगिनमध्ये कोणत्या?...

Web Title: rajesh mandlik write social media poem in saptarang