

Marathi Self Help and Poetry Books
esakal
‘मी’ म्हणजे आपल्या विचारांची व पदाची ओळख, तर ‘स्व’ म्हणजे विचारांची आणि मूल्यांची ओळख... इतक्या सोप्या शब्दांत ‘स्व’ची ओळख करून देणारं ‘जगायचं कसं?’ हे पुस्तक आपण आपलं आयुष्य साधं, सोपं, सुखी व समाधानी कसं जगू शकतो याबाबत मार्गदर्शन करतं. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. सुमारे २२ प्रकरणांमधून त्यांनी आपल्या जगण्याशी निगडित अनेक घटकांचा वेध घेतला आहे. त्यात स्वभाव, सवय, ताण-तणाव, वेळेचं गणित इथपासून सोशल मीडियापर्यंत अनेक घटकांचा समावेश आहे.
वैशिष्ट्य : मुद्देसूद मांडणी, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देणारी लेखनशैली.
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १९२, n मूल्य : २९९ रु.