Marathi Balnatya : रामदास केदार यांच्या बालनाट्यलेखनातून मुलांना प्रेरणा देणारे संदेश

School Dramas : रामदास केदार यांच्या 'पुस्तकांच्या गावाला जाऊ या!' या बालनाट्य संग्रहातून उलगडणारा सामाजिक जाणिवांचा प्रवास; मुलांच्या कोवळ्या मनावर संस्कार करणाऱ्या सात प्रेरणादायी नाटिकांचा आणि बदलत्या काळातील मूल्यांचा वेध घेणारा गोविंद गोडबोले यांचा विशेष लेख.
Marathi Balnatya

Marathi Balnatya

esakal

Updated on

गोविंद गोडबोले- saptrang@esakal.com

रामदास केदार यांनी बालकांसाठी बालनाट्य लेखन करून वर्तमानातील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करत बालकांनी प्रकाशांच्या पाऊलवाटेने कसे चालावे, हे नाट्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बालनाट्यलेखन हे एक कलात्मक कार्य आहे. ज्यामधे मुलांच्या कोवळ्या मनांचा विचार करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला जातो. बदलत्या काळाचे, परिस्थितीचे प्रतिबिंब केदार यांच्या बालनाट्य लेखनातून उमटलेले दिसते. सध्याच्या पिढीसाठी मनोरंजनाजी इतकी माध्यमे आली आहेत की, नाट्यलेखन करणाऱ्या नाट्यलेखकांनी लेखन करावे की नाही, हाच मोठा प्रश्न पडतो आहे. अशा स्थितीतही केदार यांनी समाजाचे अंतरंग व बाह्यरंगाचे वास्तव दर्शन घडवून मुलांची मने प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ‘पुस्तकांच्या गावाला जाऊ या!’ या पुस्तकातील नाटके वाचत असताना आपण नक्कीच वास्तवाशी समरस होऊन जातो. त्यांच्या लेखनातील भाषा ही समकालीन असल्याने नाटकातील पात्र आणि संवाद अगदी आपल्या परिसरातले आणि जवळचे वाटू लागतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com