‘प्रभात’ कंपनी पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर कोल्हापूरवर काही काळ औदासीन्य पसरले होते; पण अल्पकाळच ते टिकले. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत राजाराम महाराज यांनी आपली पूर्वीची घोड्याची पागा असलेली जागा देऊ केली. चित्रनिर्मितीसाठी लागणारी उत्तम, अद्ययावत यंत्रसामग्री परदेशातून मागवली आणि ‘कोल्हापूर सिनेटोन’ हा स्वयंपूर्ण स्टुडिओ आणि संस्था उभी राहिली.