Premium|RBI Repo Rate Hike : रेपो रेटमध्ये वाढ; रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची दिशा बदलली

Why the RBI Raised Interest Rates : रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ करत पतधोरणाची भूमिका बदलली आहे. महाग कच्चे तेल, मजबूत डॉलर आणि जागतिक व्याजदरांमुळे महागाईचा धोका वाढला असून, या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा.
RBI Repo Rate Hike

RBI Repo Rate Hike

esakal

Updated on: 

सुहास राजदेरकर - suhas.rajderkar@gmail.com

रिझर्व्ह बँकेने विकासाला चालना देण्यासाठी २०२५मध्ये रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांपर्यंत टप्याटप्याने खाली आणला होता. तो अध्याय आता संपला आहे. दरवाढीपेक्षाही मोठा संकेत होता तो धोरणात्मक भूमिकेतील बदलाचा. ही भूमिका ‘तटस्थ’ वरून ‘संतुलित कडक धोरण’ (कॅलिब्रेटेड टायटनिंग) अशी बदलली. या मागची कारणे आणि परिणामांविषयी...

भारतीय अर्थव्यवस्था २०२०-२१च्या कोविडनंतर बऱ्यापैकी सावरली होती आणि सुधारतही होती. अमेरिकेच्या विविध धोरणांनंतर भूराजकीय अशांतता वाढली, इराण युद्ध सुरू झाले आणि अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा इराण अधिक खंबीर निघाल्यामुळे युद्ध लांबले. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला, भाव गगनाला भिडले. महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला. तरीसुद्धा भारतामध्ये पेट्रोल-डिझेल साठा आणि वस्तूंचे भाव यांवर लगेचच तितका गंभीर परिणाम झाला नाही. आजही आपले व्याजदर जगातील बहुतेक देशांच्या व्याजदराच्या तुलनेत कमी आहेत.

महाग कच्चे तेल, मजबूत डॉलर आणि चढे जागतिक व्याजदर यांचा भारतातील किमतींवर होणारा परिणाम रोखण्यासाठी, रिझर्व्ह बॅंकेने ७ ऑक्टोबरला पतधोरण पुनरावलोकनात रेपो रेट अर्थात व्याज दर २५ बेसिस पॉइंट्‌सन वाढवून ५.५० टक्के केले. फेब्रुवारी २०२३ नंतरची ही पहिलीच दरवाढ आहे. विकासाला चालना देण्यासाठी २०२५मध्ये रिझर्व्ह बँकेने हा दर ६.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांपर्यंत टप्याटप्याने खाली आणला होता. तो अध्याय आता संपला आहे. दरवाढीपेक्षाही मोठा संकेत होता तो धोरणात्मक भूमिकेतील बदलाचा. ही भूमिका ‘तटस्थ’ वरून ‘संतुलित कडक धोरण’ (कॅलिब्रेटेड टायटनिंग) अशी बदलली. सोप्या भाषेत सांगायचे तर, दरकपात सध्या विषयपत्रिकेवर नाही; पुढचे पाऊल आणखी दरवाढ किंवा विराम असेल. पतधोरण समितीच्या सहाही सदस्यांनी दरवाढीला पाठिंबा दिला, तर भूमिकेतील बदल ४ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com