
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
आईकडे गेले असताना एका छोट्या कपाटाचं ‘ते’ दार उघडलं गेलं आणि दिसला ‘तो’ ढीग-कॅसेट्सचा! आईही म्हणाली, ‘‘याचं काय करावं कळतंच नाही, ठेवून काय करणार आणि टाकायचं तरी कसं?’’
मी म्हणलं, ‘‘हो नको टाकायला, कारण ही गाणी मिळतील एका क्लिकवर; पण याची कव्हर्स... त्यावरची चित्र... याचा स्पर्श आणि गंध... तो आता कुठेच मिळणार नाही... दुकानातही नाही!’’ काही कव्हर म्हणजे तर गाण्याच्या शब्दांची उलगडली जाणारी इवलीशी पुस्तकंच होती!