Reena Saini Kallat and Contemporary Art ...उत्तरांच्या शोधातून साकारते कलाकृती

Reena Saini Kallat Contemporary Art : आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या भारतीय समकालीन कलावंत रीना सैनी कल्लत चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण आणि इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून स्मरण, अस्मिता, सीमारेषा आणि स्थलांतर यांसारखे विषय मांडतात. प्रत्येक कल्पनेसाठी योग्य कलामाध्यम निवडणे हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य आहे.
Reena Saini Kallat Contemporary Art

Reena Saini Kallat Contemporary Art

esakal

Updated on: 

हर्ष भटकळ

आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असलेल्या रीना सैनी कल्लत या कलावंत म्हणून स्वतःला कुठल्या साच्यात अडकवून घेत नाहीत. कलेसाठी त्या विविध पर्याय निवडतात. कधी कॅनव्हास किंवा अन्य बाबींचा त्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी उपयोग करतात. आठवणींमधून कलाकृती तयार करता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

भारतीय समकालीन कलावंतांपैकी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखल्या जाणाऱ्यांपैकी रीना कल्लत एक आहेत. पेंटिंग, शिल्पकला, छायाचित्रण आणि इन्स्टॉलेशन या सर्व माध्यमातून तीन दशकावून अधिक काळ स्मरण, अस्मिता, सीमारेषा आणि स्थलांतर यांच्या विषयीचे विविध प्रश्न त्या हाताळत आल्या आहेत. त्यांच्या कलाकृती जगभराच्या म्युझियम आणि गॅलरीत प्रदर्शित झाल्या आहेत. कोणीही कलावंत सुरुवातीला कशाचा शोध घेतो? बहुतेक जण म्हणतात, कॅनव्हास किंवा ब्रश. कदाचित शिल्पासाठी योग्य दगड वा एखादा चांगला कॅमेरा. रीनाजी सुरुवात करतात वेगळ्या शोधाने. त्या आधी एखादे निरीक्षण नोंदवतात. त्यातून प्रश्न निर्माण होतो. ज्याचे उत्तर त्यांना शोधावेसे वाटते. त्यानंतर कुठे त्या ठरवतात कोणत्या माध्यमातून उत्तर शोधायचे ते. कधी उत्तर सापडते पेंटिंग मध्ये तर कधी हजारो रबरी शिक्क्यांसोबत ज्यावर विस्मरणात गेलेल्या वस्तूंचा उल्लेख सापडू शकेल. कदाचित विजेच्या तारांची नाजूक गुंफण सीमा आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर सुचवू शकेल. क्वचित समुद्राच्या पाण्यात विरघळणारे मीठ. तर कधी त्यांच्या आईने हाती लिहून ठेवलेल्या पाककृतीच्या ब्रेलमधील खाणाखुणात. माध्यम बदलते. पण यामागील विचार सुसंगत असतो. फक्त वेळ जातो तसतशी विचारपद्धती अधिक प्रगल्भ व व्यापक होत जाते. गेल्या काही वर्षांत निरनिराळ्या माध्यमांत काम करणे हे कल्लत यांच्या कामाचे विशेष ठरले आहे. त्यांची कला काही देशात सर्वत्र ज्ञात आहेच शिवाय युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिका खंडातही पोचली आहे. तरी त्यांचे लक्ष या यशाकडे किंवा कीर्तीत गुंतले नसून स्वतःच्या कल्पनाविस्तारास, तसेच त्यांची जडणघडण, अर्थपूर्णता आणि प्रत्येक कल्पनेला योग्य माध्यमाची निवड याच्याकडे असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com