व्यथा मुलं न होण्याची

आज आम्ही ऑफिसमध्ये गेलो नव्हतो. आम्हाला बाळ हवे, त्यासाठी डॉक्टरांची आज वेळ घेतली होती. आम्ही तिकडे गेलो होतो
regret not having children involuntary childlessness depression mental health
regret not having children involuntary childlessness depression mental health sakal
Updated on
Summary

आज आम्ही ऑफिसमध्ये गेलो नव्हतो. आम्हाला बाळ हवे, त्यासाठी डॉक्टरांची आज वेळ घेतली होती. आम्ही तिकडे गेलो होतो

पुण्यात ऑफिसमधली कामे संपल्यावर माझा बालपणीचा मित्र समीर जाधवला फोन केला. आम्ही भेटणार होतो. ठरल्याप्रमाणे मी समीरच्या घरी गेलो. समीर, दुर्गा वहिनी दोघेजण आयटीमध्ये काम करतात.

समीर आणि समीरच्या पत्नी दुर्गा या दोघांनी माझे स्वागत केले. बोलताता मी सहज विषय काढला, तुम्ही आज ऑफिसवरून लवकर आलेले दिसताय. समीरने दुर्गाकडे नजर टाकली आणि तो म्हणाला, ‘‘आज आम्ही ऑफिसमध्ये गेलो नव्हतो. आम्हाला बाळ हवे, त्यासाठी डॉक्टरांची आज वेळ घेतली होती. आम्ही तिकडे गेलो होतो.’’

समीर बोलल्यावर आम्ही दोघेही शांत बसलो. बराच वेळाने समीर म्हणाला, ‘‘चला, आज बाहेर जेवणाचा मूड आहे.’’ समीरची बायको समीरवर लगेच ओरडली. म्हणाली, ‘‘तुमचा रोज बाहेर जेवणाचा मूड असतो? डॉक्टर थकले बाहेरचे खाऊ नका हे सांगून.’’ समीरने त्यांचे मित्र डॉ. पंडित कुलकर्णी यांच्यासह अनेक मित्रांना फोन केला. एका हॉटेलवर आठ जोडप्यांचा जेवणाचा बेत ठरला.

त्या लखलखत्या हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होती. माझ्या आवडीचा भाकरी, पिठलं, ठेच्याचा मेनू तिकडे मिळणार नव्हता. समीर मला म्हणाला, ‘‘संदीपराव, सांगा तुमच्या आवडीचे जेवण.’’ मी म्हणालो, ‘‘ आज तुमच्या आवडीचे खायचे, तुम्ही मागवा.’’

बाकी सगळ्यांचे तेच म्हणणे होते. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये जेवण यायला किती वेळ लागेल माहिती नव्हते. समीरने जेवणाची ऑर्डर दिली. त्यातले बरेच पदार्थ माझ्या ओळखीचे नव्हते. तिथे भाजी-पोळीचा तर काही संबंध नव्हताच.

ऑर्डर घेतल्यानंतर कॅप्टन शांतपणे म्हणाला, ‘‘साहेब, आज खूप गर्दी आहे, वेळ लागेल.’’ आमचा एकमेकांचा परिचय झाला. आणि आमच्या गप्पा सुरू होणार, तितक्यात दुर्गा वहिनीसमोर बसलेली महिला डॉ. पंडित यांच्याकडे बघत म्हणाली, ‘‘आज झाली का तपासणी? काय म्हणाले डॉक्टर.’’ इथून सगळ्या विषयाला सुरुवात झाली.

त्या सगळ्या उच्च शिक्षित असणाऱ्या महिला आणि पुरुष देखील सहजपणे सगळ्या गोष्टी बोलत होते. मासिक पाळी, गर्भधारणा, मानसिक आजार, पीसीओडी, पीसीओएस, घरच्यांची स्वप्न, समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आणि वांझोटी वांझोटी हा सतत कानावर पडणारा शब्द.

तिथे असणाऱ्या एका जोडप्याचा मुलगा सोडला तर एकालाही मुलगा नव्हता. डॉ. पंडित जे या सर्वांचे डॉक्टर होते, ते प्रसूती तज्ज्ञ होते. त्यांना दोन मुली होत्या, पण त्या इथे आल्या नव्हत्या. आम्ही आता दुसऱ्या एखाद्या विषयावर बोलणार इतक्यात दुर्गा यांना फोन आला.

दुर्गा फोनवर बोलत होत्या. थोड्या वेळाने दुर्गाचा एकदम भडका उडाला. दुर्गाने फोनवर जोरात सांगितले, ‘‘सासूबाई, मला मूलबाळ या विषयावर बोलायचे नाही.’’ आणि दुर्गाने फोन कट केला. दुर्गाच्या मोठ्या

आवाजामुळे आम्ही सगळेजण एकदम शांत झालो. दुर्गा समीरवर एकदम भडकली. म्हणाली, ‘‘तुमच्या आईला काही काम नसते, मला सतत एकच विचारत असते. आज दवाखान्यामध्ये गेली होतीस काय? काय म्हणाले, डॉक्टर.

कधी होणार तुला गर्भधारणा.’’ समीरने एकदम मान खाली घातली, तो शांत झाला. दुर्गा तिच्या बाजूच्या असलेल्या मैत्रिणीला मोठ्या आवाजात सांगत होती, ‘‘कंटाळा आलाय मला रोज, रोज तेच तेच ऐकावे लागते. कधी माझ्या आईचा फोन येतो, तर कधी सासूचा फोन येतो.

आता मला मूळबाळ होत नाही त्यात माझा काय दोष आहे. सहा-सहा वेळा माझा गर्भ आपोआप पडला, त्यात माझा काय दोष?’’ दुर्गा बोलताना सगळेजण एकदम शांत झाले. दुर्गा म्हणाली, ‘‘अंगामध्ये ताकद राहिली नाही.

कुठले काम करावे अशी इच्छा राहिली नाही.’’ शरीर एकदम खिळखिळे होऊन गेले, असे म्हणत दुर्गा आपल्या हातामधला रुमाल घेऊन स्वतःचे डोळे पुसू लागली. बाजूची मैत्रीण तिची समजूत घालत होती. सोबत असणाऱ्या बाकीच्या महिला दुर्गाच्या सुरामध्ये सूर मिसळून बोलत होत्या.

जी अडचण दुर्गाची होती, तीच अडचण त्या बाकीच्या महिलांची होती. त्या सर्व महिला नोकरी करणाऱ्या उच्चशिक्षित महिला होत्या. त्या महिलांमध्ये आपण काय बोलावे, हा माझ्यासमोर प्रश्न होता, डॉ. पंडित म्हणाले, ‘‘विचार करा, इथे आठ जोडपी आहोत.

या आठपैकी सहा जणींना गर्भ राहणे ही अडचण आहे. महाराष्ट्रात, देशात सगळीकडे हाच असाच रेषो कायम आहे. नवीन पिढीला एखाद्या अपत्याला जन्म देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

एका जागी बसून असणाऱ्या नोकऱ्या, रुचकर जेवणाच्या नावाखाली अतिशय घाणेरडे, वाईट काहीतरी खाणे, सतत मांसाहारी जेवण, प्रचंड तणाव, अजिबात व्यायाम न करणे, असे एक नाही अनेक कारणे आहेत. ज्यामुळे गर्भ राहत नाही, राहिलेला गर्भ टिकत नाही.’’ डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून सारेच एकदम शांत झाले.

आमचे जेवण आले. डॉ. पंडित यांनी केवळ सूप घेतले. मी डॉक्टरांना विचारले, ‘‘तुम्ही जेवणार नाहीत.’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘मी रात्रीच्या वेळी जेवत नाही. दिवसा सकाळी एकदा भाकरी, भाजी, दही, ताक, तूप असे खातो. दुपारी फळांचा नास्ता, रात्री सूप असे माझे असते.’’

डॉक्टरांच्या भाषेमध्ये जे चमचमीत होते, ते विषासमान होते. याच जेवणामुळे गर्भधारणेसारखे महत्त्वाचे विषय बाजूला पडतात. बाजूला बऱ्याच वेळापासून थांबलेला कॅप्टन आमच्या जवळ येऊन शांतपणे डॉक्टरांच्या समोर येऊन म्हणाला, ‘‘तीन वर्षांपूर्वी माझी बायको माझ्यामुळे तिला मूलबाळ होणार नाही हे कळल्यावर निघून गेली.

तिने तिकडे लग्न केले. आता तिला दोन मुली आहेत.’’ असे बोलून तो बिचारा शांत बसला. ज्या एका महिलेने तिच्या सोबत मूल आणले होते, ती लगेच म्हणाली, ‘‘तुम्ही एखाद्या संस्थेकडून मूलबाळ घ्यायचे होते ना, किंवा कृत्रिम गर्भधारणाही करता आली असती.’’

समीर यांचा मित्र विकास लगेच म्हणाला, ‘‘अहो, एखादा मुलगा दत्तक घेण्यासाठी आता सहा-सहा वर्षे थांबावे लागते. कृत्रिम बाळ ही गोष्टही सोपी नाही.’’ एकेक करत हाच विषय आमचा रंगत चालला होता. आमचे जेवण झाले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. जाताना समीर म्हणाला, ‘‘ज्या जोडप्याबरोबर तो मुलगा आला होता ना, तो त्यांनी दत्तक घेतलाय.’’ मी एकदम चकित झालो. रात्री झोपेपर्यंत हाच विषय माझ्या डोक्यात होता.

दुसऱ्या दिवशी उठल्यावर मी दिवसभर पुण्यामधल्या अनेक भागांमध्ये फिरलो, ज्या महिलांशी माझे बोलणे झाले, त्यांचे गर्भधारणा या विषयाला घेऊन आलेले अनुभव खूप वाईट होते. त्या महिला केवळ आयटीमध्ये काम करणाऱ्या होत्या असे नव्हे, त्या सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या होत्या.

मी या विषयाच्या अनुषंगाने असणारे अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञ लोकांशी बोललो, त्यांनी भविष्यात हा विषय अजून गंभीर होईल, असेही मला सांगितले. जेव्हा मी या विषयाच्या खोलात गेलो तेव्हा या विषयामागे असणारे सगळे अर्थकारण, समाजकारण, मानसिक स्थिती अत्यंत बिकट, माणुसकीला लाजवेल अशीच होती.

एका गर्भाचे दुःख काय असते हे त्या गर्भाभोवती असणाऱ्या सगळ्या विषयाला समजून घेतल्याशिवाय निश्चितपणे कळणार नाही. कृत्रिम गर्भधारणा हा विषय गर्भाला आणि मनाला आनंद देणारा नक्की नाही, पण काय करणार, हल्ली हे प्रमाण वाढले आहे. हल्ली अनेक ठिकाणी गर्भ भाड्याने मिळतो. काय माहिती, हे कधी थांबणार आणि कसे टिकणार.

इथे तुमचे संस्कार, तुमचे राहणीमान, तुमच्या कमी असलेल्या गरजा. तुमच्या इंद्रियांवर तुम्हीच ठेवलेला ताबा, या सगळ्या गोष्टींचा संबंध निश्चितच येतोच येतो. हे मला त्या सगळ्या लोकांना, महिलांशी बोलताना जाणवत होते. हा विषय आपण जेवढा विचार करतो, तेवढा सोपा निश्चितच नाही. ‘जितके शिकले तितके हुकले’ असे गर्भधारणा या विषयाला घेऊन म्हणायची वेळ आली आहे. आपण ज्ञान मिळून यंत्रे मोठी बनवली, पण नवीन पिढी घडवण्याच्या कामात अपयशाची खोली दर दिवशी वाढत चालली आहे, बरोबर ना...!

आम्ही हॉटेलला पोहोचून त्या सर्व मित्रांची वाट पाहत होतो. आमचे बोलणे सुरू होते ते मूल-बाळ नसल्यामुळे समीर आणि दुर्गा यांच्या दोन्ही कुटुंबांत प्रचंड तणावाचे वातावरण आहे त्याबाबत. दुर्गा आणि समीर चाळिशी पार केले होते, पण त्यांना अजून मूलबाळ नव्हते. अनेक ठिकाणी उपचार घेतले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आम्ही दोन तास वाट पाहिल्यावर समीरचे सर्व मित्र, त्यांच्या पत्नी तिथे आल्या. आठ जोडप्यांपैकी एकाकडे मुलगा होता. बाकी सातही जण आपल्या मुलाबाळांना घेऊन आलेच नव्हते. आलेले सर्व आयटीमध्ये नोकरी करणारे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com