

Atul Dodiya art journey
esakal
हर्ष भटकळ
भारतीय कलाक्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षांत अतुल दोडिया हे एक उज्ज्वल नाव ठरले आहे, चित्रकारांच्या एखाद्या ठरावीक घराण्याचे ते मानले जातात म्हणून नव्हे तर उलट तसे होऊ नये हा त्यांचा आग्रह सातत्याने दिसून येतो म्हणूनच. पेंटिंग, इन्स्टॉलेशन, दुकानांच्या शटरवरील चित्रकाम, छायाचित्रकला, सिनेमा, महात्मा गांधी, काव्य, राजकारण, लोकसंस्कृती, कलेचा इतिहास - कोणताच विषय त्यांना वर्ज्य नाही. सगळेच विषय त्यांच्या कक्षेत आले आहेत.
माझी अशी खास चित्रशैली घडवण्यात मला कधीच रस नव्हता. प्रत्येक कलाकृतीसाठी सुयोग्य भाषेचा मी वेगळा विचार करतो,’’ अतुल दोडिया सांगत होते. त्यांचा अनिर्बंध विचार म्हणजेच खरे दोडिया! गेल्या चाळीस वर्षांत भारतीय कलाक्षेत्रामध्ये हे एक उज्ज्वल नाव ठरले आहे, चित्रकारांच्या एखाद्या ठरावीक घराण्याचे ते मानले जातात म्हणून नव्हे तर उलट तसे होऊ नये हा त्यांचा आग्रह सातत्याने दिसून येतो म्हणूनच. पेंटिंग, इन्स्टॉलेशन, दुकानांच्या शटरवरील चित्रकाम, छायाचित्रकला, सिनेमा, महात्मा गांधी, काव्य, राजकारण, लोकसंस्कृती, कलेचा इतिहास - कोणताच विषय त्यांना वर्ज्य नाही. सगळेच विषय त्यांच्या कक्षेत आले आहेत आणि यातील कोणताच विषय निवळ शोभेसाठी किंवा बांडगुळासारखा अनावश्यक वाटत नाही; प्रत्येक विषय हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्मरणयात्रेचा आणि राष्ट्रीयत्वाचा तसेच कलावंताचे समाजातील स्थान या त्यांच्या अखंड संवादाचाच एक महत्त्वाचा घटक ठरतो.
दोडिया यांची खासियत फक्त त्यांच्या चतुरस्र बहुरंगी असण्यात नाही, तर विविध अनुभव एकत्र गुंफून त्यांना खास वैयक्तिक आणि तरीही अखिल भारतीय स्वरूप देण्यात त्यांना मिळालेल्या यशात आहे. ते म्हणतात, ‘‘आपल्या एकूण जीवनप्रवाहाप्रमाणे कला ही नेहमी मोकळी ढाकळी हवी.’’