
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘रेखाचित्रम्’ हा चित्रपट म्हणजे एका अर्थाने एका हरवलेल्या काळाची, सिनेमात उघडपणे दडलेल्या चित्रचौकटींची पुनर्मांडणी आहे. हे मल्याळम चित्रपटाच्या इतिहासाचे नव्या स्वरूपातील पुनर्लेखन आहे. ज्यात चित्रपट केवळ एका रहस्याची उकल करत नाही, तर तो एक वैचारिक चिंतन घडवतो.