Feminist Indian artist Rekha Rodwittiya : स्त्रीवादी चित्रकार रेखा रोडविटिया; कलेतून घडलेली जीवनदृष्टी, शिस्त, निष्ठा आणि जबाबदारीचा प्रवास

Contemporary Indian Female Artists : "मी जन्मजात स्त्रीवादी आणि पेंटरही!" - बडोदा ते लंडन असा प्रवास करणाऱ्या रेखा रोडविटिया यांच्या कलेतील शिस्त, स्वतंत्र विचारसरणी आणि 'दी कलेक्टिव्ह'च्या माध्यमातून नव्या पिढीला दिलेल्या योगदानाचा वेध.
Feminist Indian artist Rekha Rodwittiya

Feminist Indian artist Rekha Rodwittiya

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

परदेशातील अनुभवामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्देसूद विचारांशी कलाकार रेखा रोडविटिया यांचा परिचय झाला. कलेतील प्रश्नांकडे नव्याने पाहता आले पण त्यामुळे कोणाची नक्कल करावी असा मोह त्यांना झाला नाही. ‘‘मी इतर कोणासारखे व्हायला तयार नव्हते. तो माझा उद्देश नव्हता. असे सांगून त्या म्हणतात, त्याऐवजी मी अनेक प्रश्न उभे केले. मी निरनिराळ्या कल्पना आत्मसात केल्या. त्या स्वतःला मागच्या पिढीच्या मानतात. मात्र त्यामुळे काही जबाबदारीही स्वीकारावी लागते असे त्यांचे मत आहे.

मी जन्मजात स्त्रीवादी आहे आणि हो पेंटरही.’ हे म्हणताना काही विशेष अभिनिवेशाने रेखा रोडविटिया सांगत नाहीत. कोणताही मुद्दा अधोरेखित न करता त्या हे सहज बोलावे असे सांगतात. या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात एकजीव झालेल्या आहेत. त्यांची विचारसरणी आणि व्यवसाय म्हणून नव्हे पण जगणे आणि जग पाहणे यासाठी. ‘मी जर पेंटर झाले नसते तर मी काय केलं असतं ते ठाऊक नाही. मी तसा विचार देखील करू शकत नाही.’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com