ॲप आणि गॅप

app
app

‘आदित्य ए आदित्यऽऽऽ’, आईने गॅलरीतून आवाज दिला.

खाली पार्किंगमध्ये खेळणाऱ्या आदित्यचा कोणताही प्रतिसाद नाही.

दहा-पंधरा मिनिटांनंतर पुन्हा आईने आवाज दिला. तरीही ‘नो रिप्लाय’, कौस्तुभ, निखिल, गौरव या मित्रांनाही आवाज देऊन झाले. वैतागून आई खाली गेली. ही मुले खेळणे सोडून पार्किंगच्या एका कोपऱ्यात मोबाईल घेऊन एकत्र पाहत बसली होती. आवाज ऐकताच आपापल्या घरी धूम पळाली.

पुन्हा दुसऱ्या दिवशी गौरवच्या आईला हा अनुभव आला. वॉचमन काकांनाही दररोज संध्याकाळी खेळणारी मुले गेल्या काही दिवसांपासून मोबाईल घेऊन बसलेली दिसली. ‘गेम-बीम खेळतात हो आणि दंगाही नसतो. बरंय शांत बसतात,’ वॉचमॅन काका बोलत निघून गेले.

आदित्य काही दिवसांपासून थोडा अस्वस्थ, चलबिचल, एकटा अलिप्त अन् शांत राहायला लागला होता. आई-बाबांच्या लक्षात आले होते. पण, तो, ‘काही नाही, कुठे काय?’ अशी उत्तरे देऊन टाळू लागला.

काहीतरी बिनसते आहे; पण काय? आईने लक्ष द्यायचे ठरवले. ही मुले दररोज संध्याकाळी पार्किंगमध्ये कॅमेऱ्यात दिसणार नाही अशा जिन्यामागच्या कोपऱ्यात बसून पॉर्न वेबसाइट्स, व्हिडिओज पाहा असत.

जान्हवी आईच्या मोबाईलवर प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन घेत राहते. ‘असला कसला मेला अभ्यास त्या डब्ब्यात कोण जाणे. आमच्यावेळी नव्हती असली थेरं,’ आईची बडबड सुरू असायची. त्याकडे दुर्लक्ष करून जान्हवी गुंग मोबाईलमध्ये! कालांतराने जान्हवीच्या ताईंच्या लक्षात आले, जे धक्कादायक होते. इयत्ता सातवीत शिकणारी जान्हवी इन्स्टाग्रामवर कुठल्यातरी मुलाशी प्रेमाचे चॅटिंग करीत होती. फोटो पाठवत होती. 

वरील दोन्ही घटनांमध्ये आजची स्मार्ट जनरेशन एक्सट्रा स्मार्ट होताना दिसते. आधुनिकतेकडे जग जात असताना बदलणारी पिढी नक्की चांगल्याच मार्गाने जाते आहे का? सोयीसाठी, सुखकर माध्यमे आली; पण त्याचा वापर गैर होऊ लागला तर भविष्य घातक आणि भयावह आहे.

ढीगभर गॅजेट्स घरात उपयोग म्हणून तर कधी प्रतिष्ठेच्या, नावाखाली आणली जातात. शिक्षण, संस्कार, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कुटुंबाविषयी आपलेपणा, प्रेम, छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या या सर्वांपासून खूप दूर चाललेली ही चिमुकली मुले त्यांना सावरणार कोण? कसे?

वय अर्धवट, काहीही चांगले सांगा पटणारच नाही. अशा टर्निग पॉइंटच्या क्षणांना सावरणे सहजशक्य आहे. थोडा वेळ लागेल, थोडे कष्ट, थोडी समझदारी ठेवावी लागेल. 

 सर्वप्रथम मुलांना समजून घ्या की, त्यांचे वय स्वतःला चांगले-वाईट कळण्याचे नाही.

 मुलांना जवळ घ्या, त्यांना दररोज आवर्जून वेळ द्या.

 त्यांना सध्या आपण मोठे होत असल्याची जाणीव आतून होत असते, त्यांना गृहीत धरू नका.

 छोटी-छोटी का होईना कामे सांगा, जबाबदारी द्या.

 लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टवॉच, टॅब, कॉम्प्युटर आदी गॅजेट्स वापरताना लक्ष ठेवा. काढून घेऊ नका, योग्य वापर शिकवा.

 वेगवेगळ्या ॲप्सवर चॅटिंग करताना त्यांच्याही नकळत कोणती महत्त्वाची माहिती, दस्तावेज शेअर होत नाहीत ना, यावर लक्ष ठेवा अथवा त्याविषयी सोबत बसून व्यवस्थित माहिती द्या. ठरावीक ऐवज मुलांपासून दूर ठेवा.

 आपल्या मुलांची संगत कशी आहे, त्याच्या शाळेत, क्लासमध्ये, खेळाच्या ग्राउंडमध्ये जाऊन पाहा. त्याविषयी मुलांशी बोला.

 हार्मोनल चेंजेस, फिजिकल चेंजेस यांमुळे मनात येणारे विचार मुलांनी मनमोकळेपणाने आपल्याशी बोलावेत इतके जवळचे-मित्र/मैत्रीण बनण्याचा पूर्ण प्रयत्न करा.

 शक्यतो मुली बोलत नाहीत, भारतीय संस्कृती, बुजरेपणा, भीती तर मुलांमध्ये स्मार्टनेस आणि हट्ट, हेकेखोरपणामुळे पालकांच्या जवळ येत नाहीत. अशावेळी आपला हुद्दा, राग, प्रतिष्ठा सगळे बाजूला ठेवून मुलांना समजून घ्या.

 त्यांच्यातील बदल साहजिक आहेत. त्यांच्या मनात येणारे आकर्षणाचे, कुतूहलाचे विषय त्या वयात नैसर्गिक आहेत, याची त्यांनाही स्पष्टपणे जाणीव करून द्या.

 बदलत्या हार्मोन्समुळे आपल्यामध्ये तयार होणाऱ्या अवाजवी, अयोग्य भावनांना आवर कसा घालायचा किंवा अभ्यास, खेळ, प्रशिक्षण यामध्ये स्वतःला जास्तीत जास्त गुंतवून कसे घ्यावे, याकडे लक्ष द्यावे.

 आठवड्यातून/महिन्यातून एकतरी फॅमिली ट्रिप किंवा छोटे गेट टुगेदर अरेंज करावे. मुलांचा आपलेपणा कायम राहील.

 एकूणच काय तर आपल्या घरातील संस्कार, वातावरण, आसपासचा परिसर या सर्वांचा मुलांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com