
गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
आपल्याला कोणी बघू नये अशी गोपूची इच्छा होती, पण कुणीतरी बघितलंच. “गोपू? अरे थांब, गोपूच आहेस ना?” त्याचं काय झालं, आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला म्हणून मी नवीन गोष्ट शोधत निघाले आणि शोधता शोधता पोहोचले कोलकत्यात! तिथे भेटला मला हा गोपू! पण तो असा लपून छपून कुठे निघाला होता? तेही एकटाच?