Premium|Russia Parliamentary Election 2026 : रशियाच्या निवडणुकीत पुतीनसमर्थक पक्षाचे बहुमत; विरोधकांवर प्रश्नचिन्ह का?

Russia’s Parliamentary Election and United Russia : रशियाच्या संसदीय निवडणुकीत पुतीनसमर्थक युनायटेड रशियाला बहुमत मिळाले. युद्धकाळातील राजकीय वातावरण, विरोधकांवरील निर्बंध, माध्यमस्वातंत्र्य आणि युक्रेनच्या व्यापलेल्या भागांतील मतदानावरून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले.
Russia’s Parliamentary Election and United Russia

Russia’s Parliamentary Election and United Russia

esakal

Updated on: 

हर्ष काबरा - saptrang@esakal.com

रशियात नुकत्याच झालेल्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा निव्वळ देखावा. युक्रेन युद्धाची भयंकर जळमटे, ढासळती अर्थव्यवस्था, भीषण राजकीय दडपशाही आणि आभासी प्रतिमेत अडकलेले पुतीन कोणाचेही ऐकत नसून, मंत्री मान डोलवण्यापुरते उरले आहेत. संपूर्ण देश एक तुरुंग बनला आहे; तुरुंगपाल मात्र एका भूमिगत तळघरात दडून बसला आहे...

रशियातील युक्रेनवरील पूर्ण आक्रमणानंतरच्या पहिल्या संसदीय निवडणुका अपेक्षेप्रमाणे पूर्वनियोजितच ठरल्या. आमिषे आणि दबावाच्या जोरावर व्लादिमीर पुतीन यांनीच निकालाची सर्व सूत्रे हलवली. त्यांच्या ‘युनायटेड रशिया’ पक्षाने संसदेच्या कनिष्ठ गृह डुमामध्ये ५७.८३ टक्के मते आणि ४५० पैकी ३५५ जागा मिळवत बहुमत साध्य केले. यासाठी निकालांत हेरफेर करण्याचे कष्टही सत्ताधाऱ्यांनी घेतले नाहीत. विरोधकांना तुरुंगात डांबून, माध्यमस्वातंत्र्य मोडून आणि मतदानाची डिजिटल यंत्रणा स्वतःच्या दावणीला बांधून या निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीचा निव्वळ देखावा उभा केला. याशिवाय, आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत रशियाने २०२२मध्ये बळकावलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांमध्येही मतदान घेतले. युद्धामुळे जनता होरपळत असल्याने यंदाची परिस्थिती काहीशी वेगळी होती; निकाल मात्र बदलला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com